पंजाब विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधीच आम आदमी पक्षाला विजयाबद्दल खात्री वाटत आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वीच पक्षाच्या राष्ट्रीय कार्यालयाबाहेर धन्यवाद देणारे बॅनर लागले आहे. पंजाब निवडणुकीच्या एग्जिट पोलमध्ये आम आदमी पक्ष आघाडीवर असल्याचं दिसून येतंय. यानंतर पक्ष आपल्या विजयाबद्दल खूपच आश्वस्त आहे. पक्ष कार्यालयाच्या बाहेर भगवंत मान यांच्या फोटोसह धन्यवादचे बॅनर लावले आहे. तसेच, कार्यालयाला फुलं आणि फुग्यांनी सजवण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, संगरूर स्थित आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री पदासाठीची उमेदवार भगवंत मान यांच्या घरावर फुलांची सजावट करण्यात आली आहे. सकाळपासूनच तिथे जिलेबी तयार करण्यात येत आहे.

Election Results: डिपॉजिट जप्त म्हणजे नेमकं काय?; नेमकी किती रक्कम केली जाते जप्त?

विशेष म्हणजे आज सकाळी ८ वाजल्यापासून पंजाब विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. पंजाबच्या एकूण ११७ विधानसभा जागांवर अनेक उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. पंजाबमध्ये २० फेब्रुवारीला मतदान झाले होते. या निवडणुकीत एकूण १३०४ उमेदवार रिंगणात उतरले आहे. यामध्ये १२०९ पुरुष तर ९३ महिला उमेदवार आहेत. तर दोन तृतीयपंथी उमेदवार आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election celebration of aap even before the results are announced pvp