आजकालची मुलं लहान वयातच खूप वेगाने सगळ्या गोष्टी शिकताना दिसतात. या मुलांना कळायला लागल्यापासून ती केवळ नवीन टेक्नॉलॉजीच आत्मसात करत नाही तर ती घरातील मोठ्या व्यक्तींसारखी हुशार, समजूतदारही होतात. ही एका अर्थी चांगली गोष्ट असली तरी लहान मुलांना वेळीच शिस्त लावली नाही तर ती वायाही जातात. आपल्या मनाला पाहिजे त्या गोष्टी करु लागतात. अशावेळी त्यांना लहान- मोठ्यांची किंमत राहत नाही. काहीवेळा ती इतके हट्टी होतात की, ते स्वत:ला पाहिजे ती गोष्ट करताना किंवा घेताना इतर कोणाच्याही शब्दाला महत्त्व देत नाहीत. नुकतीच अशीच एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये एका आत्याने आपल्या भाचीला लॅपटॉप वापरु देण्यास नकार दिला, यामुळे तिला इतके वाईट वाटले की, तिने स्वत: कार्डबोर्डवर एक लॅपटॉप डिझाइन केला. ज्याचा एक फोटो आता सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ज्यामध्ये एका मुलीने तिच्या घराबाहेर एक नोटीस लावली आणि त्यावर त्याने २ लाख रुपयांना वडील विकणे आहे असे लिहिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२ लाखात वडील विकणे आहे

मुलाने दारावर लावलेली नोटीस पाहून तुम्ही अंदाज बांधू शकता की, ती तिच्या आत्याच्या बोलवण्यामुळे किती नाराज झाली होती. यामुळे तिने लॅपटॉपसाठी थेट वडिलांनाच विकण्यासाठी ठेवले.

हा फोटो @Malavtweets नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय की, किरकोळ वादात ८ वर्षाच्या मुलीने त्याच्या वडिलांना विकण्यासाठी घराबाहेर एक नोटीस चिकटवली आहे. यावरुन मला कळून चुकले की, माझी किंमत नाही. व्हायरल फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की, मुलाने त्याच्या घराच्या दारावर ‘फादर ऑन सेल’ अशी नोटीस लावली आहे, ज्यामध्ये त्याने ठळक अक्षरात लिहिलेय की, मी वडिलांना २ लाख रुपयांना विकत आहे. जर कोणाला खरेदी करायचे असेतील तर घराची बेल वाजवून संपर्क साधावा.

नोटीस वाचून युजर्सना हसू आवरणे झाले अवघड

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या पोस्टवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. याशिवाय नोटीस वाचल्यानंतर यूजर्स हसण्याची इमोजी शेअर करून त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलेय की, आज मी इंटरनेटवर पाहिलेली सर्वात मजेदार गोष्ट. दुसर्‍याने एकाने खिल्ली उडवत लिहिले की, याउलट, मला वाटते की, तो तुमची खूप किंमत करतो, कारण मला आठवते की, माझ्या लहान वयात आम्हाला २ लाख रुपये म्हणजे भरपूर पैसे वाटायचे. त्यामुळे या पोस्टवर तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करु नक्की सांगा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father on sale for 2 lakh son bid after argument with dad for laptop notice image goes viral on social media sjr