Viral video: सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ पाहिला मिळतात. जणू हा व्हिडीओचा खजिनाच आहे. इथे तुम्हाला मनोरंजनापासून, धक्कादायक आणि माहितीपूर्ण असे वेगवेगळे व्हिडीओ पाहिला मिळतात. ये तो रील्स का जमाना है! असं म्हटलं तरी चालेल. बघावं तिकडे तरुणाई सोशल मीडियासाठी रील्स बनवताना दिसतात. यातील काही रील्स आणि व्हिडीओ नेटकऱ्यांची मनं जिंकून घेतात. एखाद्या चित्रपटातील गाण्यावर डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाला. की पुढच्या काही क्षणात तो सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये येतो. तसेच आजकाल तरुणाईमध्ये जुन्या मराठी गाण्यांचाही ट्रेंड आहे. आजकालच्या पिढीतही या गाण्याची क्रेझ पाहायला मिळते. अशाच काही तरुणींचा मराठमोळ्या गाण्याचावरचा जबरसदस्त असा डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.हा व्हिडीओ पाहून प्रत्येका तोंडून एकच वाक्य निघतंय क्या बात है.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सार्वजनिक ठिकाणी रिल्स बनवून प्रसिद्ध होण्यासाठी तरुण-तरुणी प्रयत्न करत असतात. असाच प्रयत्न या तरुणींनी केला. “उधळीत येरे गुलाल सजना तू शाम मी राधिका” गाण्यावर तरुणींनी केलेला हा डान्स सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. “उधळीत येरे गुलाल सजना तू शाम मी राधिका”… हे जुनं मराठी गाणं सध्या प्रचंड चर्चेत आहे. अगदी सोशल मीडियावरील रील्सपासून सर्वत्र या मराठी गाण्याची हवा पाहायला मिळतेय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तरुणी एका स्टेजवर मराठमोळ्या गाण्यावर बेभान होऊन नाचत आहेत.  यावेळी या तरुणी जराही तोल न जाऊ देता परफेक्ट डान्स करताना पाहून सर्वच जण या तरुणींचं कौतुक करत आहेत.

 काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ या तरुणींचा व्हायरल झाला होता त्यानंतर आता पुन्हा नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क

हा व्हिडीओ सोशल मीडियावर nisha_0911 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांंगलाच पसंतीस उतरला आहे. यावेळी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये जागा असो की नसो नाचायचं सोडायचं नाही असं कॅप्शन लिहलं आहे. अनेकांनी या तरुणींचं कौतुक करत व्हिडीओ शेयर करण्यास सुरुवात केली आहे. एकानं म्हंटलंय, “खुप छान डान्स केल स्टेज गाजवला आहे,” तर दुसरा म्हणतो “स्टेज पूर्ण गाजवला राव एक नंबर मुलींनो” अशा अनेक प्रतिक्रिया व्हिडीओवर येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girls group dance on marathi song udhalit yere gulal sajana tu sham mi radhika video goes viral srk