एखादा सार्वजनिक कार्यक्रम असेल तर नागरिकांच्या सुरक्षिततेची जवाबदारी पोलिस अधिकाऱ्यांच्या यांच्या खांद्यावर असते. सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होणार नाही, प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही आदी गोष्टींवर विशेष लक्ष देण्यात येते. तर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक पोलीस अधिकारी निरीक्षण करण्यासाठी अगदीच अनोख्या गोष्टीचा उपयोग करताना दिसले आहेत ; जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुजरातमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. गुजरातमधील एक पोलीस अधिकारी यांनी सर्वेक्षण करण्यासाठी ड्रोन, हेलिकॉप्टरची मदत न घेता पॅरामोटरचा उपयोग करताना दिसले आहेत. गुजरातमधील जुनागढ शहराचे हवाई निरीक्षण करण्यासाठी पोलिसांनी पॅरामोटरचा उपयोग केला आहे ; असे सांगण्यात येत आहे. पोलीस अधिकारी पॅरामोटरचा वापर करताना दिसत आहेत. पोलीस अधिकारी यांनी शेअर केलेला हा अनोखा व्हिडीओ तुम्हीसुद्धा एकदा नक्की बघा.

हेही वाचा…“ये लोकल दादरसे बँड्रा…” भारतीय तरुणानं अमेरिकेतील ट्रेनमध्ये दिल्या भारतीय रेल्वेच्या सूचना; VIDEO झाला व्हायरल

पोस्ट नक्की बघा :

एक्स (ट्विटर) वरील गुजरात पोलिसांच्या पोस्टनुसार, त्यांनी जुनागढमधील लिली परिक्रमेचे निरीक्षण करण्यासाठी पॅरामोटरचा वापर केला. हे एक वार्षिक तीर्थक्षेत्र आहे. परिक्रमा कार्तिक महिन्यात आयोजित केली जाते, जी सहसा नोव्हेंबरमध्ये येते आणि भवनाथाच्या मंदिरापासून सुरू होते.तसेच याचे निरीक्षण करण्यासाठी या अनोख्या पॅरामोटरचा उपयोग केला आहे. पॅराग्लायडिंगच्या खाली मोटार बसवली आहे ; ज्यात पोलीस अधिकारी बसले आहेत आणि सर्वेक्षण करताना दिसत आहे ; जे पाहून कोणालाही नवल वाटेल.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @GujaratPolice यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ; ‘जुनागडमधील लिली परिक्रमेचे प्रभावीपणे निरीक्षण करण्यासाठी गुजरात पोलिस अधिकारी पॅरामोटरचा वापर करताना’ असे कॅप्शन व्हिडीओला देण्यात आले आहे. व्हिडीओ पाहून एका युजरने ; ‘व्वा विलक्षण! भविष्यात ड्रोन पोलिसिंग होईल असे चित्र दिसते आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat police use paramotor for surveillance watch viral video asp