गेल्या वर्षभरापासून कश्मीर धुमसतंय. त्याचवेळी मानवी ढाल म्हणून तरुणाला जीपला बांधल्याने लष्करावर चोहोबाजूंनी टीका होत होती. पण लष्कराची चांगली बाजूही आहे. कदाचित ती अनेकांना माहितीही नसेल. नुकतीच काश्मीर खोऱ्यात काश्मिरमधल्या गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत शाळा भारतीय लष्कराने सुरू केलीये. काश्मीर खोऱ्यातील जनतेचं दैनंदिन आयुष्य सुरळीत व्हावं, यासाठी भारतीय लष्कर सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तेव्हा भारतीय लष्कराने सोनमार्ग भागात ‘आर्मी स्कूल’ सुरू केलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या शाळेत येणाऱ्या कोणत्याच विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारालं जात नाही. या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं, जेवण आणि इतर सुविधा पुरवल्या जातात. काश्मीर खोऱ्यात राहणारी अनेक कुटुंब गरीब आहेत. यातल्या अनेक कुटुंबातली मुलं यापूर्वी कधीही शाळेत गेली नाही. त्यांचं भविष्य सुधारावं, त्यांनाही चांगलं शिक्षण मिळावं यासाठी लष्करातल्या काही जवानांनी मिळून हा उपक्रम राबवला. ‘या शाळेत नियमित मुलं येतात, त्यांना शिकवताना एक वेगळाच आनंद मिळतो’ असं या शाळेचे शिक्षक अल्ताफ अहमद यांनी ‘एएनआय’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

Kashmiri Militants: काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल

काश्मीर खोऱ्यात फक्त दहशतवाद्यांसोबतच नाही तर अनेकदा जवानांचे सामान्य नागरिकांशी खटके उडत असतात. त्यातून सैन्यावर दगडफेकीच्या घटना इथे वारंवार घडतात. पण इथल्या नागरिकांना सैन्यावर विश्वास वाटावा, यासाठी लष्कर प्रयत्न करत आहेत

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian army start free open army school in ganderbal sonamarg