खाद्य सेवा उद्योगामध्ये रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असून हा ट्रेंड सध्या लोकप्रिय झाला आहे. जगभरातील रेस्टॉरंट्स आणि कॅफे आता सेवा, साफ-सफाई आणि अन्न तयार करण्याच्या अनेक क्षेत्रांमध्ये रेस्टॉरंट ऑपरेशन्समध्ये रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहेत. दरम्यान, चीनमधील एका रेस्टॉरंटमधून एक व्हायरल व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तंत्रज्ञान आणि करमणुकीचे विलक्षण मिश्रण दिसून आले आहे. या व्हिडीओमध्ये वेट्रेसचे रोबिटिक कौशल्य पाहायला मिळते आहे कारण ती ग्राहकांना रोबोटिक डान्स मूव्हजसह जेवण वाढताना दिसत आहे.”

व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे कारण ग्राहकांच्या सेवेसाठी हटके पद्धत वापरली आहे. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर @balakrishnanrbk या खात्यावरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ चीनमधील चोंगकिंग हॉटपॉट रेस्टॉरंटमध्ये शुट करण्यात आला आहे. या व्हिडीओची आकर्षण रोबोटचे कपडे परिधान केलेली तरुणी ठरली आहे. तसेच तीने सामान्य तरुणींप्रमाणे कपडे घातलेले आहेत, लांब केस आहेत. काही क्षणासाठी ती रोबो वाटते तर पुढच्या क्षणी तरी खरीखुरी तरुणी असल्याचा भास होतो. व्हिडीओ पाहून नेटकरी गोंधळून गेले आहेत. कारण ती सहजतेने रोबोटिक शैलीत हालचास करते आहे आणि जेवण वाढताना AI आवाजात संभाषण करते आहे. पण, जर तुम्ही बारकाईने पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की, ही रोबोट नसून प्रत्यक्षात तरुणी आहे.

हेही वाचा – दारुच्या नशेत बागेत झोपला होता व्यक्ती, अचानक बाकामध्ये अडकलं डोक….पुढे जे घडले ते व्हिडीओमध्ये बघा

व्हिडिओमध्ये ही महिला रोबोट असल्याचे भासवत असून रोबोसारख्या हालचाली करत ग्राहकांना जेवण वाढते आहे. व्हिडिओच्या कॅप्शननुसार, या तरुणीने रोबोटिक शैलीमध्ये प्रभुत्व मिळवले आहे आणि AI सारखा आवाजात बोलण्याचे प्रशिक्षणही तिने घेतले आहे. विशेष म्हणजे ही महिला चोंगकिंग हॉटपॉट रेस्टॉरंटची मालक असून ती एक व्यावसायिक नृत्यांगनाही आहे.” प्रत्येक वाटी आणि ताट जेवण देण्यापासून ते अगदी मेनू-कार्ड हाताळण्यापर्यंत सर्व काही हा रोबोट करू शकतो.

हेही वाचा – फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!

रेस्टॉरंट मालक असलेल्या या तरुणीच्या सर्जनशीलते आणि तिच्या कौशल्याचे नेटकऱ्यांनी कौतूक केले आहे. व्हिडिओला सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. पारंपारिक सेवेसह तंत्रज्ञानाची जोड देणाऱ्या तरुणीच्या पात्रतेबद्दल अनेकांनी कौतुक केले आहे. व्हिडिओवर कमेंट करत एकाने लिहिले की, “ही खरचं माणूस आहे” आणखी एकजण पुढे म्हणाला, “, ही एक रोबोटची नक्कल करणारी व्यक्ती आहे, तुम्ही आजूबाजूला जे पाहता त्या प्रत्येक गोष्टीवर तुमचा विश्वास आहे कारण.”