गौतम अदानींना एका दिवसात ६ हजार ६१० कोटींचा फटका; श्रीमंतांच्या यादीतलं स्थानही घसरलं, Amazon च्या मालकाला मात्र फायदा | Jeff Bezos Bounces Back To 2 On Forbes Rich List Gautam Adani Slips To 4 scsg 91 | Loksatta

गौतम अदानींना एका दिवसात ६ हजार ६१० कोटींचा फटका; श्रीमंतांच्या यादीतलं स्थानही घसरलं, Amazon च्या मालकाला मात्र फायदा

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी हे मागील आठवड्यात दुसऱ्या स्थानी होते.

गौतम अदानींना एका दिवसात ६ हजार ६१० कोटींचा फटका; श्रीमंतांच्या यादीतलं स्थानही घसरलं, Amazon च्या मालकाला मात्र फायदा
आजच्या आकडेवारीत अदानींची घसरण (फोटो सौजन्य – पीटीआय आणि रॉयटर्सवरुन साभार)

‘अ‍ॅमेझॉन’चे संस्थापक जेफ बेजोस यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाली आहे. वॉल स्ट्रीट म्हणजेच अमेरिकी शेअर बाजाराने उसळी खाल्ल्याने बेजोस हे जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहे. ‘फोर्ब्स’च्या ‘रियल-टाइम बिलेनियर्स इंडेक्स’नुसार बेजोस यांनी लुईस वेटनर्सचे बरनार्ड अरनॉल्ड आणि भारतीय उद्योजक गौतम अदानी यांना मागे टाकलं आहे. १६ सप्टेंबरपासून बेजोस हे या यादीत चौथ्या स्थानी होते. त्यांच्या संपत्तीमध्ये आज ३.६ बिलियन अमेरिकी डॉलर्सची वाढ झाली. त्यांची एकूण संपत्ती १४१.४ बिलियन अमेरिकी डॉलर्स इतकी झाली आहे.

अमेरिकी शेअर बाजारामध्ये विक्री मोठ्याप्रमाणात होत असल्याने अनेक अमेरिकी श्रीमंत व्यक्तींना फटका बसला आहे. अमेरिकन केंद्रीय वित्तीय संस्थ असणाऱ्या फेडर रिझर्व्हकडून महागाईच्या पार्श्वभूमीवर काही कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यता असल्याच्या चर्चेमुळे गुंतवणूकदार बाजारातून पैसा काढून घेत आहेत. मागील सहा दिवसांपासून अमेरिकी शेअर बाजारामध्ये पडझड होत आहे.

अमेरिकन शेअर बाजारामध्ये ही पडझड झाल्याने त्याचा फटका श्रीमंत व्यक्तींना बसला आहे. त्यामुळेच आता बेजोस आणि श्रीमंकांच्या यादीत तिसऱ्या स्थानी असणाऱ्या बरनार्ड यांच्यामध्ये केवळ १.४ बिलीयन अमेरिकी डॉलर्सचा फरक आहे. बरनार्ड यांची एकूण संपत्ती १४०.४ बिलियन अमेरिकी डॉलर इतकी आहे.

फोर्ब्सच्या यादीनुसार अदानी श्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानी घसरले आहे. त्यांची एकूण संपत्ती आता १३९.१ बिलियन अमेरिकी डॉलर्स इतकी आहे. अदानी यांच्या संपत्तीमध्ये आज दिवसभरामध्ये ७९६ बिलीयन अमेरिकी डॉलर्सची (सध्याच्या डॉलरच्या दरानुसार ६ हजार ५१० कोटी रुपये) घसरण झाली. मागील आठवड्याभरापासून या यादीमध्ये मोठे चढ उतार पहायला मिळत आहेत. अदानी हे मागील आठवड्यात दुसऱ्या स्थानी होते. नंतर ते तिसऱ्या आणि आज चौथ्या स्थानी घसरले आहेत.

इलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही २६३.२ बिलीयन अमेरिकी डॉलर्स इतकी आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Video : विमानतळावर हृदयविकाराचा झटका आलेल्या वृद्धाला CISF जवानाने दिले जीवनदान; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

संबंधित बातम्या

“फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते पण…”, आफताबच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने सांगितले धक्कादायक अनुभव
“मी तो पक्षी आहे, ज्याचे घरटे…”, NDTV चा राजीनामा दिल्यानंतर रवीश कुमार भावूक
Gujarat Election: काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढींच्या जाहीर सभेत गोंधळ, AIMIM वर टीका करताच…
“१०० तोंडांचे रावण” म्हणणाऱ्या मल्लिकार्जुन खरगेंना पंतप्रधान मोदींचे प्रत्युत्तर; म्हणाले, “काँग्रेसमध्ये स्पर्धा लागली की…”
कंबरेला Paytm QR कोड बांधून उच्च न्यायालयाचा शिपाई घेता होता पैसे; न्यायाधीशांनी सुनावली शिक्षा, नेमकं काय आहे प्रकरण?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Fifa World Cup 2022 : जपानचा स्पेनवर विजय, जर्मनी थेट स्पर्धेबाहेर
विवाह समुपदेशन: भांडणांत मुलांची मधस्थी नकोच नातेसंबंध,
पाथरीकरांची ‘श्रद्धा’ पण शासनाची ‘सबुरी’!; साईबाबा तीर्थक्षेत्र आराखडा तीन वर्षांपासून रखडला
रेल्वेमुळे तुळजापूर, उस्मानाबादच्या विकासाचा मार्ग मोकळा
स्मृतिभ्रंश आजार बरा करणारे औषध शोधण्यात यश ; वृद्धांना मोठा दिलासा