घरात लहान मूल असेल तर प्रत्येकाला त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता असते. ते काय खातात, कुठे जातात, कसलं लागणार तर नाही या सर्व गोष्टींकडे लक्ष ठेवणं गरजेचं असते. कारण एक चूक महाग पडू शकते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुमच्याही घरात लहान मुलं असतील तर हा व्हिडीओ पाहा आणि जागरूक राहा. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की, वेळीच मुलीचे वडील आले नसते तर मोठा अनर्थ घडला असता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालकांच्या एका निष्काळजीपणामुळे मुलांचा जीवही जाऊ शकतो. व्हिडीओमध्ये एक मुलगी घराच्या अंगणात खेळताना दिसत आहे. काही वेळातच ती खेळता खेळता स्विमिंग पूलजवळ येते आणि स्विमिंग पूलमध्ये गुडघे टेकून खाली उतरते. मुलीला पोहायला येत नाही म्हणून ती पाण्यात बुडू लागते. तेवढ्यात तिचे वडील खोलीतून धावत येतात आणि मुलीला वाचवण्यासाठी स्विमिंग पूलमध्ये उडी मारतात आणि मुलीला वाचवतात. थोडासा जरी वेळ झाला असता तर मुलीला जीव गमवावा लागला असता.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकरी अशी चूक होऊ नये म्हणून सल्ले देत आहेत. नातेवाईकही हा व्हिडीओ एकमेकांना शेअर करत काळजी घेण्यास सांगत आहेत. हा व्हिडीओ एक धडा असल्याचं सांगत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Little girl drowned in swimming pool video viral on social media rmt