गरमागरम भजी, वडा प्रत्येकाला आवडतो. तळलेले हे पदार्थ खायला जितकी मजा येते तितकंच बनवण्याचा कंटाळा. सध्याच्या तळपत्या उन्हाळ्यात उकळत्या तेलात हे पदार्थ तळताना त्या तेलातून निघणारी वाफही नकोशी असते. त्यामुळे त्या कढईसमोरही उभं राहणं नकोसं वाटतं. पण विचार करा, जर एखादी व्यक्ती या कढईतील उकळत्या तेलातच हात घालून पदार्थ तळत असेल तर… साहजिकच फक्त सांगून यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. मात्र सध्या असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून सारेच जण थक्क झाले आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भरे विकणारा किती आश्चर्यकारकरित्या भजे तळताना दिसत आहे. हा व्हायरल व्हिडीओ रायपूर बस स्टँड परिसरातला असल्याचं सांगण्यात येतंय. या व्हिडीओमध्ये एका कढईत भजे तयार होत असल्याचे दिसत आहे.

आणखी वाचा : आश्चर्य! लग्नात नवरीचा मुलगा अचानक आला समोर, मग काय झालं पाहा हा VIRAL VIDEO

पण भजे विकणारा हा व्यक्ती कढईतून तळलेले भजे काढण्यासाठी इतर कोणत्याही वस्तूचा वापर करण्याऐवजी चक्क हाताचा वापर करतो. उकळत्या तेलात हा व्यक्ती आपला हात घालून गरम गरम भजे बाहेर काढताना दिसून येतो. धक्कादायक म्हणजे या कामात त्याच्या चेहऱ्यावर किंचितही भीती दिसून आली नाही. ती व्यक्ती बेधडकपणे उकळत्या तेलात हात घालून भजे बाहेर काढते आणि कागदावर ठेवते.

भजे कागदावर ठेवून ती व्यक्ती ग्राहकाला देताना दिसत आहे. जेवण करत असताना चुकून आपल्या हातावर गरम तेल पडलं की जीव अगदी मेटाकुटीला येतो. पण चक्क हा व्यक्ती कढईत उकळत्या तेलात हात घालून भजे बाहेर काढतो आणि त्याचा यात कसल्याही वेदना होत नाही, हे पाहून लोक आश्चर्य झाले आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : चक्क हत्तीने एका महिलेसोबत केला प्रॅंक, तिची टोपीच गायब केली

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा : VIRAL VIDEO : हवेत उडवली जादुई खोकी, पुन्हा पुन्हा पाहूनही कळणार नाही जादूगाराची कमाल!

आपल्याला व्हिडीओ पाहूनही विश्वास बसत नाही आहे. तर तिथं प्रत्यक्षात उपस्थित असलेल्या लोकांनाही यावर विश्वास बसत नाहीये. हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला आहे की आतापर्यंत या व्हिडीओला ८२ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे आणि लाखो लोकांनी तो पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man taking out pakoda by hand from boiling hot oil viral video prp