scorecardresearch

VIRAL VIDEO : हवेत उडवली जादुई खोकी, पुन्हा पुन्हा पाहूनही कळणार नाही जादूगाराची कमाल!

एका जादूगाराच्या खेळाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही विचारच करत बसाल की, हे त्याने कसं केलं? असे अनेक व्हिडीओ असतात जे आपण पाहत असतो. पण आपल्या लक्षातच येत नाही. नेमकं जादूगार असं करतो तरी काय? असा प्रश्न तुम्हाला पडेल.

Magic-Viral-Video
(Photo: Twitter/ SkillsLevel )

जादूचा खेळ आणि याचे अनेक व्हिडीओ पहायला लोकांना फार आवडतात. अगदी लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच जादूचे खेळ आवडतात. हे खेळ पाहताना आपण दंग होऊन जातो. आपले डोके विचार करायला लागते. पण त्यापलिकडे आपण काहीही करू शकत नाही. जादूगाराच्या कलेला आपण दाद देतो. सध्या अशाच एका जादूगाराच्या खेळाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही विचारच करत बसाल की, हे त्याने कसं केलं? असे अनेक व्हिडीओ असतात जे आपण पाहत असतो. पण आपल्या लक्षातच येत नाही. नेमकं जादूगार असं करतो तरी काय? असा प्रश्न तुम्हाला पडेल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक जादूगार आपल्या दोन्ही हातांनी तीन बॉक्सची जादू करताना दिसत आहे. व्हिडीओ जसजसा पुढे जात आहे, तसतसा तो बॉक्सेसमध्ये ज्या गतीने हातावर फिरवतो, ते पाहून तुम्ही दंग व्हाल. तो फक्त दोन हातांनी हे करत आहे की आणखी दुसरी काही जादू आहे, असा भास हा व्हिडीओ पाहताना होऊ लागतो. नक्की घडतंय काय हे दर्शकांना समजणे कठीण होते. या जादूगाराकडे आणखी एक तिसरा हात तर नाही ना, अशी शंका येऊ लागते.

आणखी वाचा : आश्चर्य! लग्नात नवरीचा मुलगा अचानक आला समोर, मग काय झालं पाहा हा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : पाठवणीच्या वेळी नवरीऐवजी नवरदेवच ढसाढसा रडला, पाहा हा VIRAL VIDEO

नेक्स्ट लेव्हल स्किल्स नावाच्या ट्विटर पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून इंटरनेटवर एकच खळबळ उडाली आहे. १० सेकंदाच्या या व्हिडीओने लोकांना विचार करायला लावलं आहे. हा व्हिडीओ ९ लाखांहून जास्त लोकांनी पाहिला असून ३३ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. मात्र, हे पाहिल्यानंतर सोशल मीडियावरील यूजर्स चक्रावून गेले. बर्‍याच यूजर्सनी सांगितले की जादूगाराला आणखी तिसरा हात आहे, तर काही युजर्सनी यात कोणती तरी ट्रिक्स वापरली असा संशय व्यक्त करत आहेत. अनेक युजर्सचा असा विश्वास होता की जादूगार हे फक्त त्याच्या दोन हातांनी खेळ करत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video of magician creating magic illusion by juggling boxes prp

ताज्या बातम्या