नितीशकुमारांनी भाजपाची साथ सोडताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

बिहारमध्ये सद्या राजकीय घडामोडींना वेग आला असताना सोशल मीडियावरही मीम्सचा पाऊस सुरू आहे.

नितीशकुमारांनी भाजपाची साथ सोडताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
सौजन्य – सोशल मीडिया

भाजपाशी असलेला वाद शिगेला पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राजीनामा देत भाजपाशी युती तोडली. तसेच त्यांनी लालूप्रसाद यादव यांच्या पक्षासोबत सरकार स्थानपनेचा दावा केला आहे. त्यामुळे बिहारमध्ये सद्या राजकीय घडामोडींना वेग आला असताना सोशल मीडियावरही मीम्सचा पाऊस सुरू आहे.

हेही वाचा – Raksha Bandhan 2022: गोरखपूरच्या विद्यार्थिनींनी बनवली मेडिकल सेफ्टी राखी; अपघात झाल्यास ‘अशी’ येणार कामी

एका युजरने १९५१ मध्ये आलेल्या अल्बेला चित्रपटातील ‘किस्मत की हवा’ या गाण्यावर नितीशकुमार आणि लालूप्रसाद यांचे फोटो लावत एक लिप-सिंकचा एक व्हिडीओ तयार केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.

दुसऱ्या एका युजरने नितीशकुमार यांच्या युपीएतून एनडीएत आणि परत युपीएत येण्यावरूनटी एक मीम शेयर केले आहे.

हेही वाचा – शोएब अख्तर रुग्णालयात दाखल; सोशल मीडियावर भावुक Video शेअर करत म्हणाला, “ही माझी शेवटची….”

तर अन्य एका युजरने अटलबिहारी वाजपेयी यांच्या एका वाक्याचा वापर करत नितीशकुमार यांच्यावर टीका केली केली आहे. सरकार येत-जात असतात. मात्र, नितीशकुमार मुख्यमंत्री राहायला हवे, असं या मीममध्ये म्हटलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Many memes going viral on bihar politics spb

Next Story
शोएब अख्तर रुग्णालयात दाखल; सोशल मीडियावर भावुक Video शेअर करत म्हणाला, “ही माझी शेवटची….”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी