स्मार्टफोन्सच्या जमान्यात आपण कितीतरी अॅप्स डाऊनलोड करतो. या अॅप्सच्या डाऊनलोडिंगच्या वेळी ही अॅप्स आपल्याला अनेक परवानग्या विचारतात. त्यामध्ये ही अॅप्स तुमच्या फोनमधले काँटॅक्टस्, फोटोज् आणि आणखीही कितीतरी माहिती आपल्याला विचारतो. या अॅपला परवानगी दिली नाही तर ते अॅप डाऊनलोडच करता येत नाही. त्यामुळे नाईलाजाने का होईना आपल्याला या सगळ्याला संमती देतो. यामुळे आपला डेटा कोणच्याही हातात पडण्याची शक्यताही असते. पण ते अॅप वापरण्याची आपल्या सगळ्यांना एवढी घाई लागलेली असते आपण कुठल्या परमिशन्स देतो आहोत याचं भान या कोणालाही राहत नाही.
आता या सगळ्यात भर पडली आहे ती आपल्या फोनमध्ये असलेल्या सेन्सर्सची. आपल्या फोनमध्ये अनेक सेन्सर्सही असतात त्यांत दिशादर्शक, जायरोस्कोप यांचा समावेश होतो. या सेन्सर्समधला डाटा हॅक करून तुमची अतिशय महत्त्वाची माहिती हॅकर्स चोरू शकतात असी माहिती आता समोर येत आहे. तुमच्या फोनमधले हे सेन्सर्स जीपीएससाठी अतिशय महत्त्वाचे असतात. एरव्ही आपण आपल्या अॅपसाठी जी माहिती देतो त्या माहिती घेण्यासाठी आपली परवानगी तरी मागितली जाते. पण या सेन्सर्सचा डेटा मिळवण्यासाठी कोणतीही परवानगी घ्यावी लागत नाही. त्यामुळेच प्रकार धोकादायक आहे.
इंग्लंडमधल्या न्यू कॅसल युनिव्हर्सिटीमधल्या संशोधकांनी यावेर संशोधन केलं असता त्यांना यासंबंधी काही निरिक्षणं नोंदवली. त्या निरीक्षणांनुसार त्यांनी असं म्हटलं आहे की तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये काही टाईप करत असताना तुमच्या मोबाईलची जी हालचाल होते. त्यावरून तुम्ही काय लिहित आहात याचा अंदाजही ही हॅकिंग साॅफ्टवेअर्स घेऊ शकतात.
इन्फर्मेशनच्या युगात आपल्या माहितीची जपणूक करणंही महत्त्वाचं आहे बाबांनो!