Viral Video : स्वच्छतेचं महत्व ओळखणं खूप गरजेचं आहे. स्वच्छता कर्मचारी सकाळी लवकर उठून परिसर स्वच्छ करतात, तसेच प्रत्येक इमारतीत जाऊन त्यांच्या घरातील कचरा गोळा करून कचराकुंडीत टाकण्यास मदत करतात. जिथे आपण राहतो, जिथे आपण वावरतो तिथला परिसर स्वछ ठेवणं हेसुद्धा आपलं कर्तव्यचं आहे. तर आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात मेट्रोत कोल्ड ड्रिंक सांडल्यावर आई स्कार्फने ते स्वच्छ करताना दिसून आली आहे आणि हे पाहून मुलानेही आईच्या कृत्याला दुजोरा दिला आहे आणि कोल्ड ड्रिंक साफ करताना दिसून आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओ मेट्रोतील आहे. मेट्रोत आई आणि चिमुकला सीटवर बसलेले असतात. तेव्हा चिमुकल्याच्या हातातून बाटली खाली पडते आणि मेट्रोत कोल्ड ड्रिंक सांडते. तेव्हा अज्ञात व्यक्ती विचित्र हावभाव देते. मेट्रोत कोल्ड ड्रिंक सांडलेलं पाहून आई लगेच सीटवरून उठते आणि स्वतःचा स्कार्फ काढून मेट्रोत सांडलेलं कोल्ड ड्रिंक साफ करते. हे पाहून आईचा मुलगादेखील मेट्रोत सांडलेलं कोल्ड्रिंक साफ करण्यास मदत करतो. खाली सांडलेलं कोल्ड ड्रिंक मुलानेदेखील साफ केलं हे पाहून आई मुलाला मिठी मारते. मेट्रोत आईने मुलाला कशी खास शिकवण दिली एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…

हेही वाचा… संतापजनक! पाकिस्तानात जेवणाला उशीर झाला म्हणून सासऱ्याची सुनेला बेदम मारहाण, VIDEO होतोय व्हायरल

व्हिडीओ नक्की बघा :

मेट्रोत सांडलेलं कोल्ड ड्रिंक केलं स्वच्छ :

आपण प्रवासादरम्यान ट्रेन, मेट्रो, बसमध्ये कोल्ड ड्रिंक किंवा एखादा पदार्थ खातो, तेव्हा अनेकदा त्याचा कागद किंवा कोल्ड ड्रिंक प्यायल्यानंतर त्याची बाटली कचराकुंडीत न टाकता खिडकीतून बाहेर फेकून देतो किंवा ज्या सीटवर आपण बसतो तिथे बाजूला ठेवून देतो. पण, आईने असे न करता मेट्रोत सांडलेलं कोल्ड ड्रिंक स्कार्फने स्वच्छ करताना दिसून आली आहे. तसेच आपल्या मुलाला स्वच्छतेचं महत्वसुद्धा पटवून दिले आहे आणि एक चांगला संदेश लोकांपर्यंत पोहचवला आहे; जे पाहून तुम्हीसुद्धा सार्वजनिक परिसर अस्वच्छ करताना एकदा तरी विचार कराल.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @karishmasachdevofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘आई-बाबा ज्या गोष्टी मुलांसमोर करतात, त्याच गोष्टी मुलं शिकतात’ असा खास संदेश व्हिडीओ शेअर करणाऱ्या युजरने कॅप्शनमध्ये लिहिला आहे. तुम्ही आतापर्यंत मेट्रोत डान्स, भांडण, अश्लील चाळे, फॅशन शो, स्टंट आदी अनेक गोष्टी करताना पाहिलं असेल; पण पालकांचे संस्कार कशाप्रकारे मुलांना घडवतात हे दाखवणारा मेट्रोतील हा व्हिडीओ खूपच खास आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother cleaned the spilled cold drink in the metro asp