Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असता. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. सध्या असाच एका आजोबांचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आजोबा त्यांच्या मित्रांसह मनसोक्त डान्स करताना दिसत आहे. त्यांच्या डान्स पाहून कोणीही थक्क होईल. काही लोकांना त्यांची ऊर्जा पाहून प्रेरणा मिळेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक आजोबा दिसेल. हे वृद्ध आजोबा त्यांच्या मित्रांबरोबर अप्रतिम असा डान्स करत आहे. आजोबांचे वय अंदाजे ७०-८० च्या जवळपास असेल पण त्यांची ऊर्जा पाहून कोणीही थक्क होईल. त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र मंडळी सुद्धा जागेवर डान्स करताना दिसत आहे. आणि त्यांना प्रोत्साहन देत आहे. “कब क्या हो जाये किसको खबर, आ नाच ले झुमकर, ये जिंदगी एक लंबा सफर, पलभर के सब हमसफर” या लोकप्रिय गाण्यावर आजोबा सुंदर डान्स करताना दिसत आहे. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही त्यांचा चाहता होईल. या आजोबांची ऊर्जा पाहून तरुण मंडळी लाजतील.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

kharotevijay या इन्स्टाग्राम अकाउंटवरून आजोबांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कब क्या हो जाए” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “जुनं ते सोनं” तर एका युजरने लिहिलेय, “या वयात असा आनंद पाहिजे” एक युजर लिहितो, “आयुष्य असावे तर असे” तर एक युजर लिहितो, “टेंशन नाही घ्यायचं.. साहेब असचं जीवन जगायचं…” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. हा व्हिडीओ साडेतीन लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

या आजोबांचे नाव विजय खरोटे आहे आणि हे एक व्हिडीओ क्रिएटर आहेत. त्यांना इन्स्टाग्रामवर मोठ्या संख्येने लोक फॉलो करतात. ते नाशिकच्या सिडको येथील रहिवासी आहे. इन्स्टाग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ते डान्सचे व्हिडीओ, रिल्स शेअर करतात.त्यांच्या प्रत्येक व्हिडीओवर युजर्सन कमेंट्स आणि लाईक्स वर्षाव करतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik an old man amazing dance with old aged friends and told life mantra video goes viral on social media netizens shower praises ndj