Diwali Sale Top Offers for Ola Electric : भारतातील सणासुदीचा काळ लक्षात घेता अनेक इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एकापेक्षा एक जबरदस्त ऑफर्स दिल्या आहेत. यात ओला इलेक्ट्रिकने अशी एक ऑफर आणली आहे, ज्यात ग्राहकांना सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक स्कूटर ९० हजार रुपयांमध्ये खरेदी करता येईल. यासाठी ओला इलेक्ट्रिक्सने फ्लिपकार्टसह भागीदारी केली आहे, फ्लिपकार्ट द बिग बिलियन डेज सेल आणि ओला इलेक्ट्रिकच्या अधिकृत वेबसाइटनुसार, ग्राहकांना Ola S1 X 4 kWh मॉडेलवर असंख्य ऑफर्स देण्यात आल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवाळी सेलमध्ये ओला इलेट्रिक्स स्कूटरवर मिळतायत ‘या’ टॉप ऑफर्स

आपण ओलाच्या S1 X 4 kWh मॉडेलवर लक्ष केंद्रित केले आहे, कारण हे मॉडेल पॉवर आणि रेंजमध्ये दमदार आहे; शिवाय याची एक्स-शोरूम प्राइजदेखील एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे. ओला इलेक्ट्रिक वेबसाइटनुसार, ओलाची S1 X 4 kWh ही स्कूटर ९१,९९९ रुपयांमध्ये विकली जात आहे. ओलाने या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीवर आठ वर्षे/ ८०,००० किमी स्टँडर्ड वॉरंटी दिली आहे, याशिवाय ग्राहकांना ४५ हजार रुपयांपर्यंतच्या एक्स्चेंज ऑफरचा पर्याय निवडू ही नवी स्कूटर खरेदी करता येऊ शकते.

EV कंपनीच्या Ola Care+ पॅकेजवर आता ५० टक्क्यांपर्यंत सूट आहे आणि त्याची किंमत ४,१२९ रुपये आहे. तसेच यामध्ये १५ हजार रुपयांपर्यंतच्या बेनेफिट्सचा समावेश आहे, जसे की फ्री लेबर सर्व्हिस, थीफ असिस्टेंट हेल्पलाइन, रेडसाईड असिस्टेंट, ॲन्युअल कॉम्प्रेसिव्ह डायग्नोस्टिक, फ्री होम सर्व्हिस, पिक-अप/ड्रॉप आणि 24/7 डॉक्टर आणि ॲम्ब्युलन्स सर्व्हिस.

फ्लिपकार्टच्या द बिग बिलियन डेज सेलमध्ये OLA S1 X 4 kWh ही स्कूटर ऑफरमध्ये ९६,९९९ ला विकली जात आहे, पण यात क्रेडिट कार्ड पेमेंट, HDFC बँकेकडून ५,७५० पर्यंत सूट देण्यात आली आहे. एचडीएफसी क्रेडिट कार्डवर सहा हजार रुपयांपर्यंतच्या डील असलेल्या फ्लेक्सिबल EMI स्कीम आहेत. अतिरिक्त तीन टक्के कॅशबॅक डीलदेखील आहे. या बँक बेनिफिट्ससह ग्राहक ओलाची S1 X 4 kWh ही इलेक्ट्रिक्स स्कूटर ९१,२४९ रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.

S1X च्या 4 kWh मॉडेलची टॉप स्पीड ९० kmph आहे. ५.५ सेकंदात ही स्कूटर ०-६० पर्यंत स्पीड देते. 4 kWh बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी ६.५ तास लागतात.

S1 X, 6 kW ही स्कूटर 4 kWh बॅटरी पॅकचा टॉप स्पीड ९० kmph आहे. एका चार्जवर याची रेंज १९० किमीपर्यंत आहे. ही स्कूटर ५.५ सेकंदात ०-६० किलोमीटर प्रति तासाच्या स्पीडने धावते. परंतु, प्रत्यक्षात रोडवर ही १६७ किमीपर्यंत धावते. ओलाच्या S1 स्कूटरमध्ये तीन राइडिंग मोड आहेत- इको, नॉर्मल आणि स्पोर्ट. यात सर्व एलईडी लाइटिंगसह ४.३ इंचाचा एसीडी डिजिटल डिस्प्ले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ola s1 x 4 kwh google trend diwali sale ola s1 x 4 kwh steal deal on flipkart big billion day sale festive offers worth up to rs 90 000 read specification and performance in this electric scooter sjr