जंगलाचा एकच नियम आहे, शिकारी नेहमी त्याच्या शिकारची वाट पाहत असतो, एक छोटीशी चूक आणि आयुष्याचा शेवट होतो. मात्र, प्रत्येक वेळी शिकारी यशस्वी होतोच असे नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक झेब्रा आणि पाच सिंहिणी समोरासमोर येतात. यामध्ये नक्की कोण जिंकलं जाणून घ्या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जीवन आणि मृत्यूची लढाई

शिकार आणि शिकारी यांच्यातील जीवन-मरणाची लढाई पाहणे अत्यंत दुर्मिळ आहे, परंतु आता लोकांच्या हातात मोबाईल आणि कॅमेरा असल्याने हे दुर्मिळ क्षण देखील कॅमेरात रेकॉर्ड करणे सोपे झाले आहे. ‘डर के आगे जीत है’ हे शिकवणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. सिंह हा जंगलाचा राजा आहे हे तुम्हाला माहीत आहेच पण बहुतेक शिकार ही सिंहीण करते.

(हे ही वाचा: विराट कोहलीचा श्रीवल्ली स्टाईल डान्स बघितला? शानदार कॅच घेतल्यानंतरचा Video Viral)

कळपाने झेब्रावर केला हल्ला

व्हिडीओमध्ये दिसणारा कळप सिंहिणीचा आहे, जो लपून झेब्रांवर हल्ला करतो. भक्ष्य पकडण्यासाठी त्यांना जिद्दीने लढावे लागत असले तरी प्रत्येक वेळी यश येत नाही. झेब्रानेही सिंहिणीला खडतर आव्हान दिले आणि शेवटी स्वतःचा जीव वाचवण्यात त्याला यश आले. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, झेब्रा सतत धावत आहे आणि सिंहीणी त्याला मागून पकडण्याचा प्रयत्न करत आहे.

(हे ही वाचा: Video Viral: ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’ गाण्यावरचा चिमुकल्याचा डान्स एकदा बघाच!)

व्हायरल होत असलेला हा २५ सेकंदांचा व्हिडीओ एका ट्विटर यूजरने शेअर केला आहे, जो पाहून लोक थक्क झाले. सिंहिणीने झेब्रावर हल्ला करताच ती सर्व शक्तीनिशी पळू लागते. यादरम्यान, सिंहीण त्याला मागून पकडण्याचा प्रयत्न करते. सिंहीणी झेब्राचा सतत पाठलाग करताना दिसतात.

(हे ही वाचा: Video : दुर्मिळ आजाराशी लढा देत, वयाच्या १४व्या वर्षी समुद्रावर राज्य करणारी भारताची जलपरी; गोष्ट अ’सामान्यांची – भाग १६)

विजय कोणाचा?

व्हिडीओच्या शेवटी झेब्रा पळून जाण्यात यशस्वी होतो पण सिंहीण हार मानत नाही. मात्र, ही रक्तरंजित लढाई कोण जिंकली, हे व्हिडीओमध्ये कळू शकलेले नाही. व्हिडीओला शेकडो व्ह्यूज आले असून ही संख्या सातत्याने वाढत आहे. झेब्राचे धाडस पाहून या व्हिडीओतून बरेच काही शिकता येईल. अनेक युजर्सनी व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One zebra and five lionesses who won this bloody battle find out ttg