Pakistani Girl Viral Video: सोशल मीडियावर मुलींना फॉलोवर्स जमा करण्यासाठी काही प्रमाणात कमी मेहनत घ्यावी लागते असा एक बिनबुडाचा दावा अनेकजण करतात. पण याच मुलींना चाहत्यांपेक्षा दुप्पटीने ट्रोलर्सचा सामना करावा लागतो हे तथ्य काहींच्या नजरेतून सुटतं. अशाच एका सुंदर इन्फ्लूएंसरला काही अहंकारी युजर्सनी कमेंट करून खाली खेचण्याचा प्रयत्न केला होता पण यावर या तरुणीने जे कमाल उत्तर दिले आहे ते पाहून तुम्हीही टाळ्या वाजवाल. इन्फ्लुएन्सर हे क्षेत्र आता प्रचंड वेगाने करिअरमध्ये रूपांतरित होत आहे अशावेळी आपल्याला खाली पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कसे हाताळावे याचे हे उत्तम उदाहरण पाकिस्तानी क्रिएटर तरुणीने दाखवले आहे. नेमका प्रकार काय चला पाहूया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेकदा मुलींची ओळख ही किचनपर्यंतच मर्यादित राहावी यासाठी डार्क ह्युमरच्या नावाखाली अनेकजण तोंडाला येईल ते बोलतात. उदाहरण द्यायचं तर आता या कशफ अली क्रिएटरने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये ‘आस्क मी एनिथिंग’ अशी पोस्ट केली होती. तुम्हाला माहीतच असेल हे एक असे फीचर आहे ज्यावर तुमचे फॉलोवर्स रिप्लाय करून तुम्हाला प्रश्न विचारू शकतात किंवा कमेंट करू शकतात. तर या कशफच्या स्टोरीवर एका अतिहुशार व्यक्तीने तिला “जाऊन भांडी घास जा” असे सांगितले. यावर उत्तर देण्यासाठी कशफने एक खास व्हिडीओ बनवला आणि त्याच व्हिडिओमध्ये एक सणसणीत उत्तर सुद्धा दिले आहे.

विशेष म्हणजे अजिबात न चिडता आणि उगाच आव न आणता कशफने उत्तर देत म्हटले की, “घ्या, घासली मी भांडी, आता? ठीक आहे, सगळेच जेवतात, सगळेच भांडी घासतात. आता प्रत्येकवेळी जेवायला काय नवीन भांडी आपण विकत घेऊ शकत नाही ना, धुवून घासूनच घ्यावी लागतात. तुम्ही पण ना… भांडी घासल्याने काय मी लहान किंवा मोठी होते का? हे एक साधं काम आहे जे मी केलं, पण हे काम करायला सांगून तुम्ही महिलांचा किंवा कोणाचाही अपमान करताय असं तुम्हाला का वाटतं? निदान त्यासाठी तरी वेगळं काहीतरी बोलायला शिका”

हे ही वाचा<< रस्त्याच्या कडेला चुकूनही गाडी थांबवू नका, स्कुटी तर नाहीच! ‘हा’ क्षण पाहून अंगावर येईल काटा

कशफचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तिच्या या खरमरीत उत्तराचे सगळेच कौतुक करत आहेत. भांडी घासणे, जेवण बनवणे, कपडे धुणे या प्रत्येकाच्या गरजा आहेत आणि त्या स्वतः पूर्ण करणे हे अभिमानाची गोष्ट आहे. हा अभिमान प्रत्येकाने बाळगायला हवा उलट दुसऱ्याला स्वतःचं काम करायला लावण्यात मोठेपणा नाही. अशा पद्धतीच्या पाठिंबा दर्शवणाऱ्या कमेंट्स या व्हायरल व्हिडीओवर येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rude troll tries to insult girl saying bartan dho ja her savage reply video shows true spirit of equality people call beijjati svs