एकीकडे ग्रामीण भागातील शिक्षणाचा स्तर सुधारण्यासाठी सरकार कोट्यवधी रुपयांच्या वेगवेगळ्या योजना राबवत आहे. तर दुसरीकडे खुद्द शिक्षण विभागातील काही लोकच अशा योजनांना काळीमा फासण्याचे काम करत आहेत. कारण सरकारी शाळांमधील शिक्षणाच्या गैरसोयीबद्दलचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एका प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मुलांच्या स्कूल बॅग डोक्याखाली घेऊन जमिनीवर निवांत झोपल्याचे दिसत आहेत. एवढेच नव्हे तर शाळेतील मुलं अभ्यास करण्याऐवजी शाळेत झाडू मारताना दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पालकांनी संताप व्यक्त केला आहे. तर हा व्हिडीओ मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील असल्याचं उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभागात एकच गोंधळ उडाला आहे. तर आरोपी मुख्याध्यापकाची ओळख पटल्यानंतर त्याच्याविरुद्ध शिक्षण विभागाने तपास सुरू केला असल्याचं सांगितलं जात आहे.

हेही पाहा- Zomatoची दही साखर तर स्विगीची मिर्ची…, चांद्रयान ३ मोहिमेला शुभेच्छा देण्यासाठी मुंबईसह UP पोलिसांनी केलेली भन्नाट ट्विट पाहाच

व्हायरल व्हिडीओ पाहताच संतापले पालक –

हा व्हिडिओ छतरपूर जिल्ह्यातील लवकुशनगर ब्लॉकचा असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये, प्राथमिक शाळेच्या वर्गात, एक व्यक्ती आरामात झोपलेली दिसत आहे. उशी न मिळाल्याने त्या व्यक्तीने मुलांच्या स्कूल बॅग डोक्याखाली घेतल्याचं दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये शाळकरी मुले शाळेच्या आवारात झाडू मारताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ लवकुशनगर ब्लॉकमधील बजौरा गावातील सरकारी शाळेतील असून जमिनीवर झोपलेली व्यक्ती शाळेचे मुख्याध्यापक राजेश कुमार अदजारिया असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाल्यानंतर या शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक चांगलेच संतापले आहेत. शिवाय अशा परिस्थितीत आपल्या मुलांना चांगले शिक्षण कसे मिळणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्तित केला आहे. दरम्यान, पालकांनी या प्रकरणाची शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे.

शिक्षण विभागातही खळबळ, चौकशी सुरू –

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा शिक्षण विभागातही खळबळ उडाली आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी एम.के. कौटार्य यांनी संकुल प्राचार्य व गटशिक्षणाधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. झोपलेल्या शिक्षकाला नोटीस बजावण्यात आली असून लवकरच या शिक्षकावर कडक कारवाई केली जाईल, असा दावा केला जात आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School bag under headmasters head and broom in students hand in government school video goes viral on social media jap