Viral video: रस्त्यावर गाडी चालवताना सावध राहा, वाहतुक नियमांचं पालन करा, वेगावर नियंत्रण ठेवा अशा सूचना वारंवार केल्या जातात. कारण देशभरात होणाऱ्या एकूण अपघातांपैकी ९० टक्के अपघात हे बेशिस्त ड्रायव्हिंगमुळेच होतात. अन् याचिच प्रचिती देणारी आणखी एक घटना समोर आली आहे. यामध्ये एका गरोदर अजगराला भर रस्त्यात चिरडलं आहे. यावेळी त्याची सगळी पिल्ले बाहेर आली आहेत. अजगराची अवस्था पाहून खरंच तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात; तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, जो पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. 

हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. हा अपघात एवढा भयानक आहे की याचा व्हिडिओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भर दुपारच्या वेळी रस्ता ओलांडणाऱ्या एका गरोदर अजगराचा अपघात झाला आहे. गाडीनं या अजगराला अक्षरश: चिरडून टाकलं आहे. यावेळी या अजगाराच्या पोटातील सर्व पिल्ले बाहेर पडली असून त्यातली काही पिल्लेही चिरडली गेली आहेत. जवळ जवळ ५०, ६० पिल्ले रस्त्यावर चिरडून पडली आहेत. तर अजगराचा तर मृत्यू झालाय. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

पाहा व्हिडीओ

अपघाताचा व्हिडीओ cnxnews या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ लाखो नेटकऱ्यांनी पाहिला असून जवळपास सर्वांनीच दु:ख व्यक्त केलं आहे. शिवाय गाडीच्या ड्रायव्हरवर कठोर कारवाई करा अशी मागणी देखील काही जण करताना दिसत आहेत. असो, तुम्हाला काय वाटतं असे अपघात करणाऱ्या लोकांना कुठली शिक्षा द्यायला हवी?

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking accident involving pregnant python on road video goes viral on social media srk