भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीचा लकीसोबतच्या फोटोशूटची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. सौरभ आणि त्याची पत्नी डोना हिने सोशल मीडियावरुन सौरभ आणि सनाचे काही फोटो शेअर केले आहेत.प्रिमियम ज्वेलरी ब्रॅण्डसाठी करण्यात आलेल्या जाहिरातीवेळी काढलेल्या या फोटोंना सध्या चांगली पसंती मिळते आहे. क्रिकटर्समध्ये यापूर्वी सचिनची मुलगी सारा यांचे फोटोही नेटिझन्समध्ये लोकप्रिय झाल्याचे पाहायला मिळाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चित्रपट क्षेत्रातील सेलिब्रिटींच्या मुलांची सोशल मीडियावर बऱ्याचदा चर्चा रंगताना दिसते. यामध्ये करिश्मा कपूर आणि तिच्या जान्हवी आणि खुशी या दोन मुलींची, सैफ अली खान आणि त्याची मुलगी सारा अली खान हिची आणि शाहरुख खानसोबत सुहाना खान यांचे फोटो पाहायला मिळाले आहे. त्यात आता क्रिकेट जगतातील बाप-लेकीचा फोटो व्हायरल होताना दिसतोय.

या फोटोमध्ये सौरभची मुलगी गुलाबी रंगाची साडी नेसल्याचे दिसते. तर सौरभने काळ्या रंगाचा कोट परिधान केल्याचे दिसते. सौरभची पत्नी डोनाने फेसबुक अकाऊंटवर फोटो शेअर करताना लिहिलंय की, माझी मुलगी सनाचा वडिलांसोबत पहिला फोटोशूट आहे. सौरभने देखील मुलगीसोबतचे फोटो अधिकृत फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. सौरभची मुलगी सना हिचा जन्म २००१ साली झाला असून, ती आता १६ वर्षांची झाली आहे. वडिलांसोबत केलेल्या फोटोशूटमध्ये ती खूपच सुंदर दिसते.

Viral Video : अजगर मगरीची पाच तासांची झुंज!

 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sourav gangulys first photo shoot with daughter sana most like on social media