वाहतुकीचे अगदी छोटे छोटे नियम आहे. त्यातून तुमच्या सुरक्षेसाठी अनेकदा ‘गाडी चालवताना फोनवर बोलू नका’, ‘गाडी चालवताना मेसेज करू नका’ अशा अनेक सूचना चालकाला केल्या जातात. पण या सुचना कोणीही गांभीर्याने घेत नाही. जो तो सर्रास वाहतुकीचे हे नियम पायदळी तुडवतो. ठिकठिकाणी सूचनाफलकही लावले असतात पण याकडे बघतंय कोण? तेव्हा लोकांमध्ये अधिक जनजागृती व्हावी यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने एक व्हिडिओ तयार केलाय जो सध्या सोशल मीडियावर तुफान गाजतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचा : एमिरेट्स एअर लाईनमधला ‘तो’ धक्कादायक प्रकार सोशल मीडियावर व्हायरल

रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी त्याने एक मोहिम राबवली आहे आणि या मोहिमेअंर्तगत एक व्हिडिओ तयार करण्यात आलाय. हा व्हिडिओ इतका प्रभावशाली आहे ही प्रत्येक जण विचार करू लागतो. अनेकदा रस्त्यावर चालताना अनेकांना चॅटिंग करत चालायची सवय आहे. चॅटिंग करत चालल्याने अपघात होतात. जर आपण चालताना मेसेज करू शकत नाही तर गाडी चालवता आपण मेसेज कसे काय करतो? असा प्रश्न यात विचारण्यात आलाय. तेव्हा गाडी चालवताना मेसेज करण्याचा प्रयत्न केल्यावर काय होते हे या व्हिडिओतून दाखवले आहे. तुमच्याही ओळखीतल्या मित्र मैत्रिणींना गाडी चालवताना अशी करण्याची सवय असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवा कदाचित हा व्हिडिओ पाहून तरी ते वेळीच जागरुक होतील.

वाचा : ट्रम्प यांच्या त्या वाक्यानं फ्रान्सच्या फर्स्ट लेडीही झाल्या खजील!

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South africas western cape government road safety campaign video goes viral on social media