या कडाक्याच्या थंडीत आपण घरी मोठ्या आरामात चादर घेऊन थंडीचा आनंद घेत आहोत. तर, दुसरीकडे बर्फाच्या वादळांची तमा न बाळगता लष्कराचे जवान शत्रूंपासून आपले रक्षण करण्यासाठी सीमेवर खंबीरपणे उभे आहेत. उन्हाळा, हिवाळा, पाऊस कोणताही ऋतूत त्यांना सुट्टी नाही. प्रचंड बर्फवृष्टी होत असतानाही लष्कराचे जवान रात्रंदिवस सीमांचे रक्षण करण्यासाठी तत्पर असतात.
सिमेवरचा व्हिडीओ व्हायरल
भारतीय लष्कराच्या जवानांचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये देशाच्या सीमेच्या सुरक्षेसाठी त्यांची बांधिलकी स्पष्टपणे दिसून येते, जे बर्फाच्या वादळातही आपले कर्तव्य चोख बजावत आहेत. या व्हिडीओमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत असताना भारतीय लष्कराचे जवान नियंत्रण रेषेवर (LoC) गस्त घालताना दिसत आहेत.
(हे ही वाचा: भारतीय जवानाचा गुडघाभर बर्फात कणखरपणे उभा असलेला व्हिडीओ Viral; देशवासीयांनी मानले आभार)
संरक्षण विभागाने पोस्ट केला व्हिडीओ
जम्मूमधील संरक्षण विभागाने हा व्हिडीओ जारी केला आहे, ज्यामध्ये भारतीय लष्कराचे सैनिक हातात बंदूक घेऊन बर्फाच्छादित टेकडीवर सतत गस्त घालत आहेत. डोंगरावर दाट बर्फ आहे आणि बर्फही पडतच आहे. त्याच वेळी, नियंत्रण रेषेच्या पुढे असलेल्या भागात जोरदार बर्फवृष्टी दरम्यान सैन्य हालचालीसाठी स्नो स्कूटरचा वापर करत आहे. जम्मू-काश्मीरच्या केरन सेक्टरमधूनही एक व्हिडीओ समोर आला आहे.जम्मू-काश्मीरमधील अनेक उंच भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत बर्फवृष्टी होत आहे, या पार्श्वभूमीवर संवेदनशील भागात भूस्खलनाचा इशाराही जारी करण्यात आला आहे.
(हे ही वाचा: कोविडचा नवा प्रोटोकॉल पाहून व्हाल हैराण! IPS अधिकाऱ्यांनी शेअर केलेला फोटो होतोय Viral)
मुसळधार बर्फवृष्टीमुळे येथील विमानसेवाही प्रभावित झाली असून अनेक उड्डाणे रद्द करावी लागली आहेत.
(हे ही वाचा: राष्ट्रप्रेम! ८००० फूट उंचीवर गायलं ‘माँ तुझे सलाम’ गाणं; व्हिडीओ होतोय Viral)
त्याचवेळी पीआरओ उधमपूर लेफ्टनंट कर्नल अभिनव नवनीत यांनीही एका जवानाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हातात बंदूक घेऊन एक जवान बर्फाच्या वादळात कर्तव्य बजावण्यासाठी कसा तयार असतो हे तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता.
(हे ही वाचा: Viral Video: लग्नात नवरदेव करत होता डान्स तेव्हाच, नवरीने काढली चप्पल आणि…)
जवानाचे गुडघे बर्फात गाडले गेले आहेत, तरीही तो आपले कर्तव्य पूर्ण निष्ठेने करत आहे.