Resignation Letter Viral: आपल्याला जर नोकरी सोडायची असेल, तर प्रत्येकाला राजीनामा पत्र द्यावे लागते. आता थेट ई-मेलवरूनही राजीनामा दिला जातो आणि तो स्वीकारलाही जातो. काही लोक आपला राजीनामा अतिशय मुद्देसूद किंवा पद्धतशीर लिहितात; पण काहींचा राजीनामा इतका विचित्र असतो की, कोणीही चक्रावून जाईल. असे एकापेक्षा एक विचित्र राजीनामे आतापर्यंत सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता असाच एक राजीनामा पत्र व्हायरल झाला असून तो पाहून तुम्हीदेखील नक्कीच पोट धरून हसाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंटरनेटवरील एका राजीनामा पत्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे एक छोटेसे पत्र आहे. या राजीनाम्यामुळे इंटरनेटकर चांगलेच खूश झाले असून, प्रत्येक जण त्यावर आपला अभिप्राय देत आहे. अर्थात, या राजीनाम्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खरे तर राजीनामा पत्र लिहिताना सहसा लोक त्यांच्या बॉसचे आभार मानण्यासाठी मोठे पत्र लिहितात. परंतु, एका व्यक्तीने राजीनामा पत्रात फक्त तीन शब्द लिहिले आहेत. आता हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राजीनामा लिहिणे हीदेखील एक कला आहे. कारण- कंपनीतून बाहेर पडताना राजीनामा अशा पद्धतीने द्यावा लागतो की, पुन्हा जर तुम्ही त्याच कंपनीमध्ये येऊ इच्छित असाल, तर तिथे तुम्हाला नाकारले जाऊ नये. पण- काही लोक मात्र वाट्टेल तसा राजीनामा लिहून मोकळे होतात. असेच एक अतरंगी राजीनामा पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हे पत्र अशा पद्धतीने लिहिलेय की, जे पाहून बॉसला धक्काच बसला असेल, नेमकं लिहिलं तरी काय जाणून घेऊया…

(हे ही वाचा : विचित्र अपघात! एक वेळ अन् पुलावर धावत्या बसचे झाले ब्रेक फेल, उडविल्या चार गाड्या; थरारक Video आला समोर)

राजीनामा पत्रात साधारणपणे नोकरी सोडण्याचे कारण, आपला अनुभव, कंपनीबद्दल असलेली नाराजी या गोष्टी अशा पद्धतीने लिहिल्या जातात की, कंपनीसमोर तुमची वाईट प्रतिमा उभी राहणार नाही. पण, या कर्मचाऱ्याने तर तेवढीसुद्धा तसदी घेतलेली नाही. एका कर्मचाऱ्याने आपल्या बॉसला राजीनामा पत्र लिहताना, “बाय बाय सर” असे फक्त तीन शब्द लिहिले आहेत. या पत्राला आतापर्यंतचे सर्वांत छोटे राजीनामा पत्र म्हटले जात आहे. हेच पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

तुम्ही इतकं छोटंसं राजीनामा पत्र पाहिलं आहे का?

अवघ्या तीन शब्दांचे हे राजीनाम्याचे पत्र सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. आता हे पत्र नेमके कोणी लिहिले आहे? ती व्यक्ती कोणत्या कंपनीत, कोणत्या पदावर काम करणारी होती, याबाबत माहिती मिळालेली नाही. हे व्हायरल झालेले पत्र जुने असून या भन्नाट राजीनामापत्राला सोशल मीडियावर प्रचंड व्ह्युज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unique resignation letter shortest resignation letter three words resign viral on social media pdb