Viral Video : पुणे हे एक लोकप्रिय शहर म्हणून ओळखले जाते. येथील रस्ते, लोक, भाषा, संस्कृती, वास्तू, ठिकाणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. शहरातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा चांगलेच चर्चेत येतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात पण काही व्हिडीओ धक्कादायक सुद्धा असतात. पुण्यातील ट्रॅफिक हा तर चिंतेचा विषय आहे. नेहमी पुण्यातील वाहतूककोडींचे व्हिडीओ समोर येतात. अनेकदा वाहतूक पोलिसांचे सुद्धा काही व्हिडीओ चर्चेत येतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून पुण्यात काय चाललय, असं तुम्हाला वाटेल. या व्हिडीओमध्ये वाहतूक नियम मोडणारी व्यक्ती वाहतूक पोलिसाबरोबर गैरवर्तन करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. नेमकं काय प्रकरण आहे, जाणून घेऊ या. (viral video a man Misbehaves with traffic police pune video goes viral)

हे काय चाललंय पुण्यात!

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक व्यक्ती फोनवर बोलत दुचाकी चालवत होती. वाहतूक नियम मोडणाऱ्या या चालकाला जेव्हा वाहतूक पोलिसाने रोखले तेव्हा एका दुसऱ्या व्यक्तीने वाहतूक पोलिसावर हल्ला केला. त्यांच्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला. फुरसुंगीतील भेकराईनगर चौकातीला हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “आता पोलिसांना पण सुरक्षिततेची गरज आहे. काय चाललंय आपल्या पुण्यात”

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

_punethings या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “फोनवर बोलत दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीला रोखल्याने वाहतूक पोलिसांवरच एकाने हल्ला केला. फुरसुंगीतील भेकराईनगर चौकात हा प्रकार घडला आहे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “माज आहे” तर काही युजर्सनी वाहतूक पोलिसांवरच टीका केली आहे. या पूर्वी सुद्धा असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहे ज्यामध्ये वाहतूक पोलिसांबरोबर चालक गैरवर्तन करताना दिसले आहे. काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ समोर आला होता. त्या व्हिडीओमध्ये एक महिला वाहतूक पोलिसांबरोबर वाद घालताना दिसली होती

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video a man misbehaves with traffic police pune video goes viral ndj