सोशल मीडियावर रोज अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही आपल्याला पोट धरून हसवणारे तर काही थक्क करणारे असतात, असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजोबा मनसोक्त नागीण डान्स करत असल्याचे दिसत आहे. त्यांचा उत्साह हा तरुणाईला लाजवेल असा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्साहाला कशाचेच बंधन नसते, अगदी वयाचेही नाही याचाच प्रत्येय सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतून येत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजोबा कशाचीही चिंता न करता मनसोक्त नागीण डान्स करताना दिसत आहेत. तर त्यांच्यासोबत असणारे दुसरे आजोबाही या डान्सला उत्तमरित्या साथ देत असल्याचे दिसत आहेत. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा : नीलगाईला लांबून पाहताच वाघाने केले असे काही की…; थक्क करणारा व्हिडीओ होतोय Viral

व्हायरल व्हिडीओ :

या व्हिडीओला ३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून, सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या आजोबांच्या उत्साहाने नेटकऱ्यांची मनं जिंकली असून, ‘प्रत्येकाने कोणत्याही बंधनात न राहता प्रत्येक क्षणाचा याप्रकारे मनसोक्त आनंद घ्यावा’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video elederly man does naagin dance you will definitely go speechless seeing admirable enthusiasm at this age pns