Viral Video: लावणी हे आपल्या महाराष्ट्रातील लोकप्रिय लोककलेचा प्रकार आहे. महाराष्ट्राची शान म्हणून लावणी नृत्य ओळखले जाते. त्यामध्ये संगीत, नृत्य व गीत यांचा मिलाफ साधलेला असतो. लावणी नृत्यामध्ये कलाकार पायांत घुंगरू बांधून, ढोलकीच्या तालावर ते सादर करतात. त्यामुळे हे नृत्य आकर्षक होऊन कित्येकदा प्रेक्षकांना ताल धरायला उद्युक्त करते. सोशल मीडियावर अनेक जण ही मराठी लोककला सादर करताना दिसतात. लावणीच्या विविध गाण्यांवर नृत्य करताना दिसतात. पूर्वी फक्त महिला लावणी सादर करायच्या; आता पुरुष मंडळीसुद्धा आवडीनं लावणी नृत्य सादर करताना दिसतात. या संदर्भातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिलेच असतील. दरम्यान, आता एका लहान मुलीने सादर केलेल्या लावणीचा एक जबरदस्त व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हल्ली सोशल मीडियावर अनेक महिला कलाकारांच्या लावणी नृत्याचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. परंतु, या व्हिडीओंपैकी काही व्हिडीओंमध्ये काही महिला लावणीच्या नावाखाली त्यांच्या नृत्यातून केवळ अश्लील हावभावच दाखविताना दिसतात. फार कमी महिला त्यांच्या व्हिडीओतून साध्या व सुंदर पद्धतीने पारंपरिक लावणी सादर करतात; ज्यात कोणतीही अश्लीलता नसून, सुंदर हावभाव आणि स्टेप्स असतात. आता असाच भन्नाट व्हिडीओ समोर आलाय की, जो पाहिल्यावर तुम्ही एक-दोन वेळा नाही तर १० वेळा तो आवडीने व्हिडीओ पाहाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान मुलगी संपूर्ण साजशृंगार करून, ‘चढविला पट्टा कमरेवरी’ या गाण्यावर लावणी सादर करीत आहे. त्यावेळी तिच्या आजूबाजूला ती शिकत असलेल्या लावणी क्लासमधील अनेक मुली उभ्या आहेत. लावणी सादर करताना त्या मुलीच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप्स पाहून नेटकरीही ‘शॉक’ झाले आहेत. “हिच्यासमोर एखादी लावणीसम्राज्ञीही फिकी पडेल“, अशा आशयाचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @sonalipawar_official या अकाउंटवरूनशेअर करण्यात आला आहे. त्याला आठ लाखांहून अधिक व्ह्युज आणि ४० हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्सही यावर कमेंट्स करीत आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलेय, “४-५ वेळा बघितली लावणी तरी मन भरत नाही.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “सगळ्या फेल आहेत बाळा तुझ्यासमोर.” आणखी एकाने लिहिलेय, “प्रशंसा करताना शब्द कमी पडतील.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video girl lavani dance on chadhavila patta kamarevari marathi song expressions dance all perfect see video sap