Viral Video : लग्नात जेवणाच्याच वेळी पडायला लागला मुसळधार पाऊस; यावेळी पाहुण्यांनी जे केलं ते पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

लग्नात घडणाऱ्या अनेक गमतीजमती आपल्याला या व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून पाहायला मिळतात.

wedding buffet viral video
हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Photo : Instagram/@mr_90s_kidd_)

सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामधील बरेच व्हिडीओ वधू-वराचे, तर काही व्हिडीओ लग्नाला आलेल्या पाहुण्यांचे असतात. लग्नाच्या व्हिडीओबद्दल बोलायचे झाल्यास, यातील अनेक व्हिडीओ मजेशीर असतात. लग्नात घडणाऱ्या गमतीजमती आपल्याला या व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून पाहायला मिळतात.

लग्नाचे जेवण सर्वांनाच आवडते. बरेच लोक लग्नाला जेवायलाच जातात. अशा परिस्थितीत जर तुम्ही लग्नाला गेला असाल आणि जेवताना मुसळधार पाऊस पडला तर तुमचा मूड बिघडेल आणि खाण्याची मजाही निघून जाईल. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लग्नादरम्यान मुसळधार पाऊस पडला. यावेळी पाहुण्यांनी जेवण्यासाठी जे केलं यावर तुमचा विश्वास बसणार नाही. हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे आणि तो पुन्हा पुन्हा पाहिला जात आहे.

“मला तुझी खूप आठवण येते” डिलिव्हरी बॉयने महिलेला व्हॉट्सअ‍ॅपवर केलेले मेसेज सोशल मीडियावर Viral

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका लग्नसमारंभामध्ये पाहुणे जेवयला बसले आहेत. त्याचवेळी जोरदार पाऊस पडायला सुरुवात होते. मात्र यावेळी आपल्या जागेवरून उठून न जाता हे पाहुणे तिथे ठेवलेल्या खुर्च्या एका हाताने डोक्यावर पकडून आरामात बसून जेवत आहेत. मुसळधार पावसातही पाहुण्यांनी जेवण सोडले नाही, तर पावसाचा आनंद घेत जेवणाचाही आनंद लुटला.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोक त्याला पसंतीही देत ​​आहेत. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर mr_90s_kidd_ नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ८ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video heavy rain started falling at the wedding buffet you cant help but laugh at what the guests have done pvp

Next Story
कॅनडामध्ये आलेल्या SuperCell वादळाचा VIDEO VIRAL, थरारक दृश्य टाइमलॅप्स मोडमध्ये कॅप्चर
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी