थंडीच्या दिवसात केस धुतल्यानंतर ते सुकवण्यासाठी लोकांना बरीच मेहनत घ्यावी लागते. फक्त पार्लरमध्येच नाही तर बऱ्याच वेळा अनेक जण घरच्या घरी हेअर ड्रायरच्या सहाय्याने केस सुकवतात. यामुळे वेळ वाचतो. पण अनेकांना हेअर ड्रायर खरेदी करणं शक्य होत नाही. अशाच एका मुलाने घरच्या घरी हेअर ड्रायरसाठी एक देसी जुगाड शोधून काढलाय. त्याचा हा देसी जुगाड पाहून तुम्हीही क्षणभर या घरच्या घरी शोधलेल्या या ‘देसी जुगाड’चे चाहते व्हाल. या देसी जुगाडचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ एकदा पाहाच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात जितके जुगाड होतात, तेवढे कदाचित कुठल्याही देशात होत नसतील. आपला देश ‘जुगाड टेक्नॉलॉजी’चा सर्वाधिक वापर करतो. बऱ्याच वेळा लोक जुगाडने असे पराक्रम करतात, हे पाहून मोठे इंजिनीअर दाताखाली बोटं दाबत राहतात. असाच एक नवा जुगाड सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलाय. आपल्या भारतीयांमध्ये टॅलेंटची काही कमतरता नाही. देसी जुगाड वापरून लोक अनेक मजेशीर गोष्टी करत राहतात. कधी कधी मोठे सेलिब्रिटीही त्यांचे चाहते बनतात. एका मुलाने देसी जुगाड वापरून एक असं हेअर ड्रायर बनवलंय, ते पाहिल्यानंतर तुम्हाला हा जुगाड एकदा नक्कीच वापरून पहावासा वाटेल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा आंघोळ करून आला आणि त्याचा दुसरा साथीदार प्रेशर कुकरमधून निघत असलेली गरम वाफ त्याच्या डोक्यावर सोडतोय. प्रेशर कुकरमधून निघत असलेल्या गरम वाफेवर हा मुलगा आपले केस सुकवताना दिसतोय. इतकंच काय तर प्रेशर कुकरमधल्या गमर वाफेवर तो आपले केस सेट करतोय. प्रेशर कुकरपासून बनवलेल्या या हेअर ड्रायरचा जुगाड सर्वांनाच आवडला आहे. त्यामुळेच या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

आणखी वाचा : पार्टीसाठी सगळी तयारी केली, पण कुणी आलंच नाही! उदास मुलीचा VIDEO VIRAL

आणखी वाचा : VIRAL VIDEO : लग्न मंडप सोडून नवरी पोहोचली जीममध्ये… ब्रायडल ड्रेसमधला तिचा वर्कआऊट पाहून नेटकरी हैराण

सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होऊ लागलाय. हेअर ड्रायरला पर्याय म्हणून हा देसी जुगाड पाहून लोकांना आश्चर्य वाटतंय. काहींनी याला योग्य जुगाड म्हटलंय तर काही युजर्स या मुलाचं धाडस पाहून थक्क झाले आहेत.

कुकरचा स्फोट झाला तर?
हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर black_lover__ox या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 30 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यावर आता नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी हा देसी जुगाड असल्याचं म्हटलंय, तर काहींनी बघून हा माणूस वेडा झालाय असं म्हटलं. अनेक युजर्सनी कुकरच्या अशा वापराबाबत चिंता व्यक्त केली असून त्याचा स्फोट होऊ शकतो, असे म्हटले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of man who made hair dryer with the help of pressure cooker google trending video prp
First published on: 29-11-2021 at 21:52 IST