Viral Video: आपला कचरा आपली जबाबदारी हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण, ही जबाबदारी किती जण योग्यरीत्या पार पाडतात? आपण ज्या गोष्टी रोज वापरतो त्यातून ओला आणि सुका आदी दोन स्वरूपाचा कचरा तयार होतो, त्यामुळे जास्तीत जास्त कचऱ्याचा पुनर्वापर व्हावा ही गोष्ट आपण लक्षात ठेवून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच ट्रेन, बसस्थानक, थेएटरमध्ये, उद्याने आदी ठिकाणी बसून आपण अनेक पदार्थ खातो किंवा कोल्ड्रिंकचे सेवन करतो. तसेच आपल्यातील बरेच जण या खाद्यपदार्थांचा कचरा इथे-तिथे फेकून देतात; तर आज असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत रेल्वे डब्यात प्रचंड कचरा पाहायला मिळाला आहे.

भारतीय रेल्वे डब्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एक सफाई कर्मचारी केर काढताना दिसत आहे. प्रवाशांच्या सीटखालून झाडू मारताच मोठ्या प्रमाणात कचरा बाहेर आलेला दिसत आहे. या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी त्यांचा कचरा कचराकुंडीत टाकण्याऐवजी त्यांच्या सीटच्या शेजारीच फेकून दिला, जे पाहून सफाई कर्मचाऱ्याला तो कचरा गोळा करावा लागला आहे; असे चित्र दिसून येत आहे. भारतीय रेल्वे डब्यातील सफाई कर्मचाऱ्याचा हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…VIDEO: ‘अभी ना जाओ छोडकर…’ लाँग ड्राईव्हवर बाबा लेकीची मेहफिल; सुरेल आवाज ऐकून तुम्हीही पडाल प्रेमात

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, सफाई कर्मचाऱ्याने केर काढला तेव्हा खाल्लेल्या चिप्सच्या पाकिटांपासून ते रिकाम्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, कागदी प्लेट्सपर्यंत अनेक वस्तू कचऱ्यात जमा झालेल्या दिसत आहेत; तर या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी सफाई कामगार सज्ज झाले आहेत. त्यांनी केर काढून प्रवाशांची बसण्याची जागा पुन्हा पहिल्यासारखी स्वछ केली आहे.

सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ @Madan_Chikna या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ एका मिनिटापेक्षा कमी असला तरीही सार्वजनिक वाहतुकीतून प्रवासी कशा पद्धतीने प्रवास करतात हे अधोरेखित करते आहे. कोणतीही खंत किंवा भीती न बाळगता स्वतःची जागा कशी अस्वच्छ करतात हे व्हिडीओत दाखवलं आहे. व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनीसुद्धा चिंता व्यक्त केली आहे आणि प्रवाशांना कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे आवाहन केले आहे. तसेच एका युजरने “कृपया कचराकुंडी वापरा”, असेदेखील आवाहन केलं आहे. दरम्यान, इतरांनी व्हिडीओ पाहून चिंता व्यक्त केली आहे आणि प्रवाशांच्या वर्तनाचा निषेध केला आहे.