Viral Video Of Soft spoken Momo Seller: सध्या सोशल मीडियावर रिल्सची क्रेज आहे. प्रत्येक जण आपलं कौशल्य दाखवतं नवनवीन प्रयोग करून पाहत आहेत. काही जण स्वतःच्या व्यवसायाकडे वळू लागले आहेत. तर अनेक जण छंद जोपासत युजर्ससाठी काही तरी खास घेऊन येत आहेत. सध्या फूड व्लॉगिंग सुद्धा चर्चेत आहेत. काही नीटनेटके तर काही अस्वछ पद्धतीने खाद्यपदार्थ बनवून सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करत आहेत. एकूणच नाशिकचा डॉली चहावाला, दिल्लीच्या वडापाव गर्ल नंतर आता एक मोमोज विकणारी तरुणी व्हायरल होत आहे. पण, ही तरुणी व्हायरल होण्यामागचं कारण तिचा नम्रपणा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सहसा व्यापारीवर्ग आरडाओरडा, डान्स, काही गाणं म्हणून तर अगदी स्वॅग दाखवत खाद्यपदार्थ बनवून विकतात. पण, आज या तरुणीने सगळ्यांनाच थक्क करून सोडलं. कारण – कोणताही आरडाओरडा न करता अगदीच नम्रपणे, ग्राहकांना काय हवं नको ते पाहून, त्यांना खूप चांगली वागणूक देताना दिसत आहेत ; जे पाहून तिचं प्रचंड कौतुक होत आहे. मोमोज विकणाऱ्या नम्र तरुणीचा व्हायरल व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा.

हेही वाचा…अरे हे काय? अनावर भुकेमुळे थेट कारच्या डॅशबोर्डवरचं जेवण; VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केली गंमत

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, एक ग्राहक मोमोज खाण्यासाठी गेला आहे. तर तरुणी सुरवातीला प्लेटला बटर लावते. त्यावर ग्राहक तिला प्लेटला कोण बटर लावतं असं विचारतो? त्यावर रागावरून नाही तर अगदी नम्रपणे उत्तर देत ‘मोमोज चिकटतात म्हणून प्लेटला मी बटर लावतेय’ असं उत्तर देते. तसेच ग्राहकाच्या प्रत्येक प्रश्नाला “हां जी, हां जी” म्हणजेच (हो) असं म्हणत ती प्लेटमध्ये मोमोज सर्व्ह करून देते. तसेच ती मोमोज आणि त्याबरोबर दिली जाणारी चटणी सुद्धा तिने स्वतः बनवली असे देखील तिने नमूद केलं आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @deepakphogat30 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आरडाओरडा, ग्राहकांनावर ओरडणाऱ्या, विचित्र वागणूक देणाऱ्या अनेक व्यापाऱ्यांमध्ये मोमोज विकणाऱ्या तरुणीच्या नम्रता, तिचा स्वभाव अनेकांचे मने जिंकत आहे.नेटकरी सुद्धा मोमोज विकणाऱ्या तरुणीचं कौतुककॅमेंटद्वारे करत आहेत आणि हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात रिपोस्ट करताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows women serving only momo not variety of foods but sensations for their unique selling techniques and engaging personalities asp