Viral Video: सध्या अनेक सोशल मीडिया ब्लॉगर फूड व्हिडीओ शूट करतात. त्यामध्ये अनोख्या पाककृतींपासून एक्सप्लोर करण्यापर्यंतचे अनेक व्हिडीओ असतात. पण, सध्या सोशल मीडियावर एक वेगळीच क्रेझ सुरू आहे. लोक विचित्र पदार्थांचा उपयोग करून, विचित्र पाककृती बनवून पाहण्याचा प्रयोग करू पाहत आहेत. पण, आज हे सगळं बाजूलाच राहिलं. कारण- आज एका सोशल मीडिया युजरने हद्दच पार केली आहे. व्हिडीओत एक माणूस थेट त्याच्या कारच्या डॅशबोर्डवरून अन्न खाताना दिसत आहे. होय, तुम्ही हे बरोबर वाचलं आहे.

व्हायरल व्हिडीओ कुठला आहे याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. पण, प्रवासादरम्यान एक वाहनचालक रस्त्याकडेला थांबला आहे. यादरम्यान बहुतेक त्याला खूप मोठ्या प्रमाणात भूक लागलेली असते. त्यामुळे जवळपास ताट, पत्रावळी उपलब्ध नसल्यामुळे तो थेट कारच्या डॅशबोर्डवर अन्न ठेवून खाण्यास सुरुवात करतो. प्रथम वाहनचालक कारच्या डॅशबोर्डवर भात ठेवताना दिसत आहे. पुढे, तो भातावर माशांचा रस्सा ओततो. ग्रेव्ही आणि भात एकत्र करण्यासाठी तो चमचा आणि काटा वापरतो. अज्ञात व्यक्तीचे ते किळसवाणे कृत्य व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…माकडांचा चिमुकल्यावर हल्ला; पळण्याचा प्रयत्न करताच खेचलं खाली अन्… कशी झाली सुटका VIRAL VIDEO तून पाहा

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, एक माणूस अन्न थेट डॅशबोर्डवरून खाताना दिसत आहे. भात, ग्रेव्ही डॅशबोर्डवर मिक्स करून, तेथेच तो खाण्यास सुरुवात करतो. मधेच तो एखादे पेयही घेतो. जेवण झाल्यावर तो डॅशबोर्ड टिश्यूने पुसतो. मग तो डॅशबोर्ड पूर्णपणे साफ करण्यासाठी क्लीनर वापरतो. अशा रीतीने तो जेवणासाठी डॅशबोर्डचा उपयोग करतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @qazghazaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत सुमारे ३.९ दशलक्ष व्ह्युज मिळाले आहेत. नेटकरीसुद्धा व्हिडीओवर मजेशीर कमेंट करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंट केलीय, “तू कुठे आहेस? मी तुला एक प्लेट आणून देतो थांब.” तर दुसरा युजर म्हणतोय, “काय झालंय तुला भाऊ; एक प्लेट घे आणि खा ना.” तिसरा युजर म्हणतोय, “तो प्लेट खरेदी न करण्यापासून पैसे वाचवत आहे.” एकूणच अशा मजेशीर कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.