Viral Video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही, यातील काही व्हिडीओंमुळे आपल्या चेहऱ्यावर हसू येतं; तर काही व्हिडीओंमुळे आपल्या काळजाचा थरकाप उडतो. सोशल मीडियावर बऱ्याचदा प्राण्यांचेही अनेक विविध प्रकारचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात, ज्यामध्ये अनेकदा काही प्राणी एकमेकांशी भांडण करताना दिसतात, तर काही प्राणी एकमेकांबरोबर खेळताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एक चिमुकली पिंजऱ्यातल्या माकडांबरोबर मस्ती करताना दिसतेय. पण, यावेळी अचानक असं काहीतरी होतं जे पाहून तुम्हाला धक्का बसेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्राणीदेखील मनुष्यांप्रमाणेच हुशार असतात. त्यांनाही माणसांप्रमाणे भावना असतात, त्यामुळे त्यांना जर कोणी विनाकारण त्रास देत असल्यास ते त्यावर लगेच प्रतिक्रिया देतात. या व्हायरल व्हिडीओमध्येही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली प्राणिसंग्रहालयात गेली असून यावेळी ती पिंजऱ्यातल्या माकडाला विनाकारण त्रास देऊ लागते. यावेळी माकड पटकन पिंजऱ्यातून एक हात बाहेर काढते आणि तिचे केस ओढते. बराचवेळ तो तिचे केस ओढतो. त्यानंतर तिचे बाबा तिथे येतात आणि तिची माकडाच्या तावडीतून सुटका करतात. हा व्हिडीओ पाहून अनेक जण प्राण्यांना विनाकारण त्रास देऊ नका असा सल्ला देत आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ak_sharmaa86 या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत आठ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तर एक लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.

हेही वाचा: ‘नशीब चांगलं असलं की मृत्यूही मागे फिरतो…’ श्वानावर बिबट्याचा क्रूर हल्ला.. पण, पुढे जे घडलं; VIDEO पाहून उडेल थरकाप

पाहा व्हिडीओ:

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘असंच पाहिजे हिला’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘बापरे, माकडालाही खूप राग येतो’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘म्हणून विनाकारण पंगा नाही घ्यायचा’ तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘बाळ सांभाळून, माकडं खूप भयानक असतात.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video the monkey pulled the girls hair you will be shocked after seeing the video sap