आपल्याला एखादा ड्रेस इतका आवडतो की, तोच ड्रेस वेगवेगळ्या रंगांमध्ये आपल्याकडे असावा असे आपल्याला वाटते. पण एकच ड्रेस रंग बदलताना तुम्ही कधी पाहिलाय का? इन्स्टाग्रामवर सध्या असाच एक अचंबित करणारा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेने परिधान केलेला पांढरा ड्रेस उन्हात गेल्यानंतर चक्क गुलाबी होत असल्याचे दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडिया इनफ्लूएन्सर इझी यांनी हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडीओमध्ये एक पांढरा ड्रेस परिधान केलेला दिसत आहे, पण जेव्हा त्या उन्हात जातात तेव्हा या ड्रेसचा रंग बदलून गुलाबी होतो. हा रंग बदलणारा ड्रेस पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडिओ.

Viral Video : चिखलात अडकलेल्या हत्तीच्या पिल्लाला तिने केली मदत; पिल्लाच्या प्रतिक्रियेने जिंकले नेटकऱ्यांचे मन

व्हायरल व्हिडीओ :

उन्हात रंग बदलणारा हा ड्रेस ‘PH 5’ या ब्रँडचा असून, हा ब्रँड युवी रिॲक्टिव्ह कपडे बनवण्यासाठी प्रसिद्ध असल्याची माहिती कॅप्शनमध्ये देण्यात आली आहे. या व्हिडीओला ३ कोटी ५० लाख व्ह्यूज मिळाले असून, २० लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. रंग बदलणाऱ्या या ड्रेसची संकल्पना नेटकऱ्यांना आवडली असून, हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video women wears unique dress that turns pink from white in the sun netizens are shocked pns