तंत्रज्ञानाच्या जोरावर देशात खूप प्रगती होत आहे. त्याची अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. पण, आता तंत्रज्ञानाची तुम्हाला तोंडातील चवीबाबतही मदत होणार आहे. त्यामुळे २०२४ पर्यंत तुमच्या जेवणाच्या टेबलवरील खाण्याचा अनुभव खूप बदलणार आहे. कारण- आपण कसे खातो ते काय खातो यापेक्षा महत्त्वाचे असते. पण आपण काय खावे? आता या तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्व गोष्टी अगदी वेगळ्या दिसू शकतात. Deliveroo च्या रिपोर्टनुसार- खाद्यप्रेमींसाठी ही वाईट बातमी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बहुतेक माता आपल्या मुलांना नावडता पदार्थ भरवण्यासाठी जी युक्ती वापरतात, तीच युक्ती तंत्रज्ञानाच्या मदतीने वापरली जाईल. तुम्ही श्वास घेतल्यानंतर तुम्ही काय खाल्ले आहे ते कळेल.

पण, ब्रिथ टेक ते पुढील स्तरावर घेऊन जाईल. ‘स्नॅक ऑफ द फ्युचर’च्या एका अहवालानुसार, तुम्ही या उपकरणात श्वास घेतल्यानंतर तुम्हाला ते सांगेल की, कोणते पदार्थ चांगले आहेत आणि कोणते तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाहीत. यामुळे घरातील महिलांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण- जे पदार्थ मुले खात नाहीत, तेच पदार्थ त्यांना खाऊ घालण्यासाठी करावी लागणारी मेहनत या तंत्रामुळे कमी होणार आहे. म्हणजेच जी मुले पालक खात नाहीत, त्यांना मोमोजमध्ये भरून पालक खाण्यासाठी देण्यापेक्षा त्यांना आरोग्यासाठी फायदे मिळतील अशा पद्धतीने खायला दिले जाणार आहे.

‘या’ तंत्राने मेंदूची होईल फसवणूक

आता या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुमच्या मेंदूची फसवणूक होऊ शकते. त्याला व्हर्च्युअल रिॲलिटी आणि ऑगमेंटेड रिॲलिटी तंत्रज्ञान, असे नाव देण्यात आले आहे. समजा, तुम्ही पालक खात असाल; पण या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुमच्या बुद्धीला तुम्ही चॉकलेट खात आहात, असे भासवले जाईल. त्यामुळे तुम्हाला खरोखरच्या चॉकलेटची चव येईल. म्हणजेच तुम्ही जो पदार्थ खात नाही, त्यावेळी तुम्हाला आवडत्या पदार्थाचा विचार करूनही त्या पदार्थाची चव तुमच्या तोंडाला येईल. त्यामुळे चमचमीत खाणाऱ्या मुलांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. उदा. समजा तुम्हाला नावडती भाजी तुम्ही खात असाल त्यावेळी तुम्ही स्मार्ट चष्मा लावून चॉकलेट किंवा मिठाई खात आहात, असे वाटू शकते.

किमान आरोग्याच्या दृष्टीने धान्यात चांगले बदल दिसू शकता. गहू, मका व तांदूळ यांच्याऐवजी भविष्यात तुमच्यासमोर राजगिरा, फोनियो, ज्वारी, टेफ, खोरासन, एकोर्न व एमर यांसारखी अन्नधान्ये असतील. हा अहवाल योग्य असल्यास त्वचा मऊ ठेवण्यासाठी तुम्ही फळे आणि सलाड खाण्याची गरज भासणार नाही. फूड अँड ब्यूटी इंडस्ट्रीला एकत्र मिळून काम करावे लागेल. रिपोर्टनुसार, अँटीएजिंग आइस्क्रीमसारखी खाद्य उत्पादने आणि हार्मोन संतुलन व डोपामाइन- ड्रायव्हिंग मेनूमधून जेवण करण्याची संधी पाहण्यासाठी तयार राहा, असे अहवालात म्हटले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vr glasses can make you think you are eating chocolate when youre eating vegetables sjr