भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने नवा विक्रम रचला. महिला विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मिताली सर्वात जास्त धावा करणारी महिला क्रिकेटपटू बनली आहे. ६ हजार धावांचा टप्पा गाठत तिने नवा विक्रम रचला. महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकं करण्याचा विक्रमही तिच्या नावावर आहे. या कामगिरीवर मितालीचं देशभरातून कौतुक होत असताना भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीही तिचं कौतुक करण्यात कसा मागे राहिल. तेव्हा तिच्या यशासाठी कोहलीनं तिला शुभेच्छा देण्याचं ठरवलं, पण या शुभेच्छा देताना नेटिझन्सच्या मते त्याने यात ‘विराट’ चूक केली. ती म्हणजे अशी की, विराटनं शुभेच्छा देताना मिताली ऐवजी पुनम राऊतचा फोटो अपलोड केला. विराटला ही चूक लक्षात आली नसली तरी त्याच्या सजग चाहत्यांना मात्र ही चूक लगेच लक्षात आली अन् त्याच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस सुरू झाला. ती मिताली नसून पूनम आहे हे चाहत्यांनी विराटला लक्षात आणून दिल्यावर विराटने लगेच आपली फेसबुक पोस्ट डिलीट केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचा : समुद्रात बुडणाऱ्या एका कुटुंबाला वाचवण्यासाठी ८० जणांनी घातला जीव धोक्यात

शेवटी विराटही माणूस आहे आणि चुका होणारच. तेव्हा फोटो चुकीचा असला तरी त्यामागच्या भावना आणि शुभेच्छा महत्त्वाच्या होत्या, हे लक्षात घेऊन नेटिझन्सने त्याची चूक पोटात घातली. विराटने आपली फेसबुक पोस्ट डिलीट केली असली, तरी त्याचा स्क्रीन शॉट मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मितालीच्या खेळीमुळे अनेकदा तिची तुलना सचिन तेंडुलकरसोबत केली जाते. वयाच्या १६ वर्षी तिने क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मिताली राजने ६९ धावांची खेळी केली या खेळीत ४ चौकार आणि एका षटकारचा समावेश आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये सलग सात अर्धशतके झळकावण्याचा पराक्रमदेखील मिताली राजच्या नावावर जमा आहे.

वाचा : अंध दाम्पत्याच्या ‘डोळस’ मुलीच्या ‘त्या’ फोटोमागचं ‘व्हायरल सत्य’ जाणून घ्या!

 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women s cricket world cup 2017 virat kohli congratulated mithali raj but put picture of the poonam raut