आपण सर्वांनीच आपल्या लहानपणी आजीकडून किंवा आईकडून ‘एक आटपाट नगर होतं तिकडे एक साधुवाणी राहत होता’ या चातुर्मासाच्या गोष्टी ऐकल्या असतील, याच चातुर्मासातल्या कथा आणि व्रतवैकल्य प्रेक्षकांना मालिकारूपात ‘घेतला वसा टाकू नको’ या कार्यक्रातून पाहायला मिळतात आणि हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या आवडीचा आहे. नुकतंच प्रेक्षकांनी नवरात्री विशेष भाग अनुभवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता येत्या आठवड्यापासून शनीदेवांची जन्मकथा आणि शनी देव माहात्म्य प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या निमित्ताने मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता धोंगडे एका पौराणिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

‘घेतला वसा टाकू नको’ या मालिकेत ती सूर्यदेवांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका साकारताना आणि पुन्हा एकदा टेलिव्हिजन या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी अमृताने उत्सुकता व्यक्त केली. आता ती घेतला वसा टाकू नको ‘शनीदेवांची जन्मकथा आणि शनी देव माहात्म्य’ विशेष भागातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amruta dhongade upcoming serial ghetla vasa taku nkos avb