[ie_dailymotion id=x7g1e22] प्रेमात वय बघायचं नसतं असं म्हणतात. यावर सेलिब्रिटींचा तर बराच विश्वास आहे. बॉलीवूडमध्ये तर वयात बरेच अंतर असलेल्या जोड्या आपल्याला पाहायला मिळतात. अभिषेक-ऐश्वर्या, करिना-सैफ अली खान अशी अनेक नाव या यादीत आहेत. त्यातील एक जोडी म्हणजे शाहिद कपूर आणि मीरा राजपूत. अभिनेता शाहिद कपूरची पतनी मीरा ही त्याच्यापेक्षा बरीच लहान आहे. या दोघांमध्ये जवळपास १३ वर्षांचे अंतर आहे. त्यामुळे जेव्हा शाहिद आणि मीराच्या लग्नाचे वृत्त समोर आले तेव्हा त्याच्यावर बरीच टीका करण्यात आली होती. शाहिदने मीराशी लग्न करून तिचे करियर खराब केले. तिचे वय फारच कमी आहे. इतकेच नव्हे तर मीरा आई झाली तेव्हाही त्याच्यावर टीका करण्यात आली होती.