[ie_dailymotion id=x7g1e4f] पाकिस्तानमधील तणावाचे वातावरण सध्यातरी कमी होण्याचे नाव घेत नाहीये असेच चित्र पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपटांवरील बंदी उठविण्यात येणार असल्याची चर्चा होती. रविवारी शाहरुख खानचा ‘रईस’ हा चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित करण्यात येणार होता. पण, या चित्रपटामध्ये मुस्लिम समुदायाचे चित्रण चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्यामुळे या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.