[ie_dailymotion id=x7g1ef9] बॉलिवूडची ‘बेबी डॉल’, ‘लैला’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सनी लिओनी चांगलीच गोत्यात येण्याची शक्यता आहे. घोटाळेबाज व्यावसायिक अनुभव मित्तल याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका पार्टीमध्ये अभिनेत्री सनी लिओनी आणि अभिनेत्री आमिषा पटेल यात सहभागी झाल्या होत्या. सोशल मीडियावरही हे फोटो चर्चेचा विषय ठरत आहेत. काही संकेतस्थळांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार उद्योगपती अनुभव मित्तल याने सात लाख लोकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातला होता.