[ie_dailymotion id=x7g1b7r] विनोदवीर कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात झालेल्या वादामुळे सध्या कलाविश्वात विविध चर्चांना उधाण आले आहे. कपिल आणि सुनीलचे व्यासपीठावरील खेळीमेळीचे नाते पाहता त्यांच्यात वाद झाल्याच्या चर्चांवर अनेकांचा विश्वासच बसला नव्हता. पण, सदर घटनेनंतर कपिलने केलेल्या फेसबुक पोस्टने अनेकांचेच लक्ष वेधले. पाच वर्षांत आपण पहिल्यांदाच सुनीलवर इतक्या मोठ्याने ओरडलो असल्याचे म्हणत कपिलने झाल्या घटनेबद्दल त्याची भूमिका स्पष्ट केली आहे.