[ie_dailymotion id=x7g1ad3] बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि आघाडीची नायिका अनुष्का शर्मा या जोडीला घेऊन इम्तियाज अली प्रेक्षकांच्या भेटीला येणारा आहे. ‘रब ने बना दी जोडी’ आणि ‘जब तक है जान’मधील जोडी सध्या इम्तियाजच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पंजाबमध्ये पोहोचली आहे. शाहरुख आणि अनुष्काच्या तिसऱ्या चित्रपटाच्या नावाबद्दल बरीच चर्चा रंगली होती. त्यानंतर आता चित्रीकरणाला सुरुवात झाल्यामुळे शाहरुख आणि अनुष्का पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पंजाबमध्ये चित्रीकरणासाठी गेलेल्या जोडीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये अनुष्का पिवळ्या रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये देशी अवतारात दिसते. तर शाहरुख कॅज्युअल लूकमध्ये दिसतो.