आपल्या क्रिकेटच्या प्रेमापोटी रोहन पाटे यांनी पुण्यात २०१२ साली ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’ नावाचं आगळं-वेगळं संग्रहालय उभारलं आहे. ९०च्या दशकापासून ते आतापर्यंतच्या क्रिकेट विश्वातील तब्बल ७५ हजारांहून अधित वस्तू या संग्रहालयात आहेत. सचिन तेंडुलकरची बॅट, ब्रेट लीची जर्सी, कपिल देव, धोनी अशा सर्वांच्या अविस्मरणीय वस्तूंचा ठेवा या संग्रहालयात जपला गेला आहे. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या संख्येत क्रिकेटच्या वस्तूंचा खजिना जपणारं हे जगातील एकमेव असं संग्रहालय आहे.
  
  
  
  
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 



