अमिताभ बच्चन यांच्या ‘Goodbye’ या नवीन चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात झाली. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता एकत्र दिसणार आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. पण आता रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे बरेच निर्बंध हटवण्यात आले आहेत. यामुळेच ‘Goodbye’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात झाली आहे.
  
  
  
  











 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 




