मनोरंजनाचा डबल डोस घेऊन प्रदर्शित झालेल्या ‘दे धक्का २’ (De Dhakka 2) चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्यानिमित्ताने ‘दे धक्का २’च्या टीमने ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’ला हजेरी लावली. यावेळी अभिनेते मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, गौरी इंगवले, सक्षम कुलकर्णी यांनी चित्रपटाबद्दल मनसोक्त गप्पा मारल्या. यावेळी मकरंद अनासपुरे यांनी नाम फाउंडेशने चिपळूणमध्ये केलेलं काम आणि यंदा तिथे पूर का आला नाही? याबाबत सांगितलं.






