प्रिया बापट व उमेश कामत हे ‘क्युट कपल’ तब्बल १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. ‘बिन लग्नाची गोष्ट या सिनेमात प्रिया-उमेशसह निवेदिता सराफ, गिरीश ओक, सुकन्या मोने आणि संजय मोने असे लोकप्रिय कलाकार एकत्र झळकणार आहेत. यानिमित्ताने या कलाकारांनी लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजिटल अड्डाला उपस्थिती लावली होती. यादरम्यान, कलाकारांनी लंडनचं शूटिंग, सेटवरचे किस्से सांगत दिलखुलास गप्पा मारल्या. आदित्य इंगळे दिग्दर्शित या ‘बिन लग्नाच्या गोष्टी’चे सुनील बियानी, पवन मेहता आणि नितीन प्रकाश वैद्य निर्माते आहेत.