News Flash

सलमान खानच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकला पाहिजे- राज ठाकरे

पाकिस्तानी कलाकारांची बाजू घेणे सलमान खानला चांगलेच महागात पडताना दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सलमानवर टीकास्त्र सोडत सीमेवर जवान आपल्यासाठी लढत आहेत. त्यांनी शस्त्रे ठेवली तर सलमान खान सीमेवर जाऊन उभा राहणार आहे काय असा टोला लगावला आहे. भारतात एवढे कलाकार असताना सलमानला पाकिस्तानातील कलाकारांचा इतकाच पुळका येत असेल तर त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकला पाहिजे असे त्यांनी सुनावले.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X