[ie_dailymotion id=x7g1ajd] सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला लवकरच सुरुवात होणार आहे. दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी महाराष्ट्रात लवकरच या भन्नाट स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ‘पानी फाऊंडेशन’ने या स्पर्धेचा एक प्रोमो रिलीज केला आहे. काही दिवसांपूर्वी ‘तुफान आलंया..!’ हे गीत प्रदर्शित करण्यात आले होते. यावर्षी विदर्भ योद्धा, मराठवाडा वीर आणि पश्चिम महाराष्ट्राचे मावळे अशा तीन संघाचा समावेश असेल. येत्या ८ एप्रिलपासून सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ ला सुरुवात होणार आहे. या पर्वात महाराष्ट्राच्या ३० तालुक्यांमधून तब्बल २०२४ गावं सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा ८ एप्रिल ते २२ मेपर्यंत रंगणार आहे.