‘दे दणादण’, ‘थरथराट’, ‘झपाटलेला’ असे अनेक गाजलेले चित्रपट देणारे अभिनेता,दिग्दर्शक महेश कोठारे यांनी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्यांनी संपूर्ण करिअरविषयी चर्चा केली. सोबतच अभिनेता अशोक सराफ, दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यातील मैत्रीचे अनेक किस्सेदेखील सांगितलं.