[ie_dailymotion id=x7g1ab0] बॉलिवूड अभिनेता म्हटलं की त्याचे जगभरात चाहते असणारच. मग याला वरुण धवन तरी कसा अपवाद असेल. उत्तम नृत्य आणि अभिनय याच्या जोरावर त्याने आपला वेगळा चाहता वर्गही बनवला आहे. तो आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच जोडलेला असतो. त्याचे आगामी सिनेमे, जाहिराती, प्रोजेक्ट या सगळ्याची तो माहिती आपल्या चाहत्यांना देत असतो. फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर वरुणचे लाखो चाहते आहेत. पण नुकताच वरुणने ट्विटरवर फार सक्रिय न राहण्याचा निर्णय घेतला आहे. पुढचे काही दिवस तरी तो ट्विटरवर दिसणार नाही. वरुणच्या या निर्णयामुळे त्याचे चाहते नक्कीच निराश झाले असतील.