मंत्री वडेट्टीवारांच्या विधानावर भुजबळ म्हणाले, मराठा आरक्षण टिकल पाहिजे. समाजाचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत. या मताचा मी आहे. एखादा मंत्री जेव्हा सगळ्यांसाठी काम करत असतो तेव्हा त्याला उणंदुणं करायची गरज नाही. जे नियम आहेत त्यांप्रमाणे मंत्र्यांनी काम करणं अपेक्षित आहे. मंत्र्यांचं कुठ चुकलंय हे तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे. सारथीमध्ये झालेल्या गडबडीच्या चौकशीचे पैलू वेगळे आहेत. ते सुद्धा लक्षात घेतले पाहिजेत. जे आपण करु ते सर्वांना न्याय देणारं असलं पाहिजे. त्यामुळं एकमेकांवर आरोप करणं चुकीचं आहे.





















